Zerodha Nithin Kamath : झिरोदाच्या नितीन कामत यांनी उघड केलं बंपर कमाईचं गुपित, सांगितला फ्युचर प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:13 AM2023-01-14T11:13:11+5:302023-01-14T11:27:38+5:30

नितीन कामत यांनी गुंतवणूकदारांना दिला मोलाचा सल्ला. २०२२ हे आर्थिक वर्ष झिरोदासाठी खूप चांगलं ठरलं आहे. कंपनीचा नफा दुपटीनं वाढला आहे.

झिरोदा या आघाडीच्या ब्रोकरेज फर्मसाठी 2022 हे आर्थिक वर्ष अतिशय चांगले ठरले होते. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर जवळपास दुपटीने वाढून 2094 कोटी रुपयांवर गेला आणि महसूल 80 टक्क्यांनी वाढून 4963 कोटी रुपयांवर गेला.

झिरोदाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत यांच्या मते, स्टॉकब्रोकिंग हा एक अस्थिर व्यवसाय आहे आणि तो बाजाराच्या गतीनुसार वाढतो. 2021 च्या अखेरच्या महिन्यात आणि 2022 च्या सुरूवातीला एक वेळ अशीही आली होती जेव्हा एका महिन्यात साडेतीन लाख नवीन ग्राहक जोडले गेले होते. परंतु त्यानंतर त्यात घटही झाली.

यामध्ये रिकव्हरीची आशा आहे, परंतु कामत यांना विश्वास आहे की आर्थिक वर्ष 2024 मध्येही महिन्याला साडेतीन लाख नवीन ग्राहकांची पातळी गाठणे कठीण होईल. मनीकंट्रोलशी झालेल्या संभाषणात, झेरोदाचे प्रमुख नितीन कामत यांनी कंपनीच्या भविष्यातील योजना आणि कमाईबद्दल भाष्य केले.

Zerodha च्या बॅलन्स शिटमध्ये त्यांच्या डायरेक्ट म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म कॉईनचे आकडे देखील समाविष्ट आहेत. तथापि, झिरोधाला कॉईनमधून केवळ अप्रत्यक्ष महसूल मिळतो. कारण कंपनीला वार्षिक केवळ 300 रुपये मेंटेनन्स चार्ज मिळतो. त्याच वेळी, हे शुल्क देखील केवळ सक्रिय असलेल्या युझरकडून घेतले जाते.

झिरोदाचा 70-75 टक्के महसूल सक्रिय ट्रेडर्सकडून येतो, ज्यांच्याकडून कंपनी प्रति ट्रेड 20 रुपये आकारते. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपनी कोणतेही शुल्क आकारत नाही. याशिवाय, कंपनी खाते उघडण्यासाठी आणि देखभालीसाठी जे शुल्क आकारते ते तिच्या महसुलाच्या सुमारे 7 टक्के आहे.

झिरोदाचे म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म कॉईन सुमारे 33,000 कोटी रुपयांचा निधी मॅनेज करते, याचा अर्थ त्यांचे ॲसेट्स अँड मॅनेजमेंट (AUM) 33,000 कोटी रुपये आहे. कंपनीने अद्याप याला मॉनेटाईज केलेले नाही. गेल्या वर्षी जुलैमध्ये, सेबीने एक नियम केला होता की स्टॉक आणि म्युच्युअल फंडांसाठी वेगळे पैसे ठेवावे लागतील. तर पहिल्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये ठेवलेल्या पैशांनी शेअर्स किंवा म्युच्युअल फंड खरेदी करताना काही हरकत नाही.

कॉईनवर ग्राहकांचा अनुभव खराब झाला आहे. आता थेट किंवा कोणत्याही स्टार्टअपशी भागीदारी करून सल्लागार व्यवसाय तयार करा ज्यामध्ये कॉईनची भूमिका फाऊंडेशन ब्लॉक म्हणून असेल, असे कामत यांनी सांगितले.

बाजारातील अस्थिरतेत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मजबूत राहिली. अशा स्थितीत कामत यांचा असेट्स मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्याचा विचार केला आहे. यासाठी अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. कामत यांच्या म्हणण्यानुसार, मंजुरी मिळताच तीन महिन्यांत हा व्यवसाय सुरू केला जाईल. उत्पादनाचा निर्णय घेणे बाकी आहे परंतु निष्क्रिय म्युच्युअल फंड ऑफर करण्याची योजना आहे.

बाजारात अनेक एएमसी म्युच्युअल फंड्स ऑफर करत आहे. परंतु झिरोदा या प्रकरणात काही वेगळे करणार आहे. ते केवळ हेच ऑफर करतील, जेव्हा अन्य एएमसी पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह दोन्ही म्युच्युअल फंड्स ऑफर करतात. ॲक्टिव्ह फंड्सची कमाई अधिक आहे.

सध्या, पॅसिव्ह फंडांमध्ये सर्वात कमी मॅनेजमेंट फी 0.15 टक्के आहे. कामत यांच्या मते ते खाली आणणे शक्य नाही. कामत यांनी स्पष्ट केले की जर आपण असे गृहीत धरले की 1 लाख कोटी रुपयांची AUM गाठली तर 0.15 टक्के दराने केवळ 150 कोटी रुपये मिळतील. तथापि, दुसरीकडे, भारतात 150 कोटी एयूएम मिळवणे देखील खूप कठीण काम आहे. अशा परिस्थितीत, कामत यांच्या मते, सध्याची बाजाराची परिस्थिती लक्षात घेता हे शुल्क कमी करणे फार कठीण आहे.

झिरोदाच्या नॅशनल पेन्शन स्कीम फंड निधीचे संचालन करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आता येत्या दोन-तीन आठवड्यांत ते लाइव्ह करण्याची कामत यांची योजना आहे. कामत यांच्या मते, NPS ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यात लॉक-इन कालावधी असतो.

गेल्या 20 वर्षांमध्ये, सेन्सेक्स 15.5 टक्के आणि निफ्टी 50 च्या CAGR (कम्पाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट) वर सुमारे 15 टक्के वाढला आहे. अशा परिस्थितीत नवीन गुंतवणूकदारांनी 20 ते 30 वर्षांसाठी इंडेक्स फंडात गुंतवणूक करावी का, असा प्रश्न कामत यांना विचारण्यात आला होता. कामत यांनी यावर नकारार्थी उत्तर दिले. कामत यांच्या म्हणण्यानुसार, ॲक्टिव्ह फंड्स मॅनेजर्ससाठी आता निर्देशांकावर मात करणे फार कठीण झाले आहे. तथापि, स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप क्षेत्रातील काही फंड मॅनेजर्स निश्चितपणे चांगला परतावा देऊ शकतात, म्हणजेच ते मिड-कॅप निर्देशांकापेक्षा जास्त परतावा देऊ शकतात. त्यामुळे लार्ज-कॅप स्पेसमध्ये केवळ इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करणे शहाणपणाचे नाही, असे कामत यांचे मत आहे.