खाद्यप्रेमींसाठी खूशखबर! आता दुसऱ्या शहरांमधून मागवता येतील आवडते पदार्थ; Zomato ची खास सेवा By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 11:32 AM 2022-08-31T11:32:08+5:30 2022-08-31T11:35:39+5:30
Zomato Intercity Food Delivery : खाद्यप्रेमींसाठी आता एक खूशखबर आहे. Zomato ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास सेवा सुरू केली आहे. Zomato द्वारे आता तुम्हाला इतर शहरांमधून खाद्यपदार्थ मिळू शकतात. Zomato हे एक अतिशय लोकप्रिय ऑनलाईन फूड डिलिव्हरी App आहे. आपण सर्वजण कधीनाकधी हमखास त्याचा वापर करतोच. तुम्ही Zomato वरून अनेकवेळा फूड ऑर्डर केले असेल, पण तुम्हाला माहीत आहे का की Zomato द्वारे तुम्हाला इतर शहरांमधून खाद्यपदार्थ मिळू शकतात. तुम्ही जेवण ऑर्डर देखील करू शकता.
खाद्यप्रेमींसाठी आता एक खूशखबर आहे. Zomato ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास सेवा सुरू केली आहे. Zomato द्वारे आता तुम्हाला इतर शहरांमधून खाद्यपदार्थ मिळू शकतात. तुम्ही दुसऱ्या शहरांमधूनही फूड ऑर्डर करू शकता. Zomato ने Legends नावाने इंटरसिटी फूड डिलिव्हरीचा एक पायलट प्रोजेक्ट लाँच केला आहे.
कंपनी या प्रोजेक्टद्वारे दिल्ली-एनसीआरच्या काही भागात आणि हैदराबाद, लखनऊ सारख्या अनेक शहरांमधील रेस्टॉरंट्समधून जेवण ऑर्डर करू शकते. खाद्यपदार्थांचे योग्य पॅकिंग करून ते विमानाने इतर शहरांमध्ये पोहोचवण्याचे काम कंपनी करेल. यासोबतच अन्न खराब होऊ नये म्हणून हा मोबाईल फ्रीज वापरण्यात येणार आहे.
कंपनीने सध्या तो पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केला आहे. दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, लखनौ यांसारख्या भागात याची सुरुवात करण्यात आली असून नंतर ती देशभरात विस्तारली जाईल. Zomato ने सांगितले की, 100 हून अधिक विमानतळ आणि अनेक मोठे फूड पॉइंट्स या प्रोजेक्टअंर्गत आणले जातील.
या प्रकल्पाला 'इंटरसिटी लीजेंड' असे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी झोमॅटोने 10 मिनिटांत डिलिव्हरी सेवा सुरू केली होती. यामध्ये कंपनी फक्त 10 मिनिटांत अन्न पोहोचवण्याचा दावा करत आहे. ही सेवा सध्या गुरुग्रामसारख्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे.
रेस्टॉरंटमध्ये ताजे अन्न तयार केल्यावर ते रियुजेबल आणि टॅम्पर-प्रूफ कंटेनरमध्ये पॅक केले जाते जेणेकरुन हवाई वाहतूक दरम्यान सुरक्षित राहावे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अन्न खराब होण्यापासून वाचवण्यासाठी, अत्याधुनिक मोबाइल रेफ्रिजरेशनचा वापर केला जात आहे ज्यामुळे कोणत्याही संरक्षकांशिवाय अन्न सुरक्षित ठेवण्यास मदत होते.
ऑनलाइन फूड डिलिव्हरी तसेच किराणा सामान डिलिव्हर करण्याचे काम Zomato करत आहे. Blkint अॅप विकत घेतल्यानंतर ते झोमॅटोला बॅक एंडशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे आता काही मिनिटांत किराणा सामानही तुमच्या घरी मिळू शकेल. पायलट प्रोजेक्ट म्हणून हे सुरू करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.