Job Alert:१० वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी! सुरक्षा दलात बंपर भरती, ६३ हजार रुपयांपर्यंत पगार By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 01:58 PM 2023-02-11T13:58:00+5:30 2023-02-11T14:14:25+5:30
Army Ordnance Corps Recruitment 2023: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स, संरक्षण मंत्रालयाने ट्रेड्समन मेट आणि फायरमनच्या पदांसाठी 2023 च्या भर्तीची अधिसूचना जारी केली आहे. Army Ordnance Corps Recruitment 2023: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स, संरक्षण मंत्रालयाने ट्रेड्समन मेट आणि फायरमनच्या पदांसाठी 2023 च्या भर्तीची अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट aocrecruitment.gov.in वर जाऊन रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. संरक्षण मंत्रालयाच्या या भरतीद्वारे, 1700 हून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अधिकृत अधिसूचनेनुसार, 06 फेब्रुवारीपासून ऑनलाइन सुरू झाले आहे, पात्र उमेदवार 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू आणि सबमिट करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी येथे दिलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचा. रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील खाली पाहता येतील.
ट्रेड्समन पदासाठी 1249 जागा रिक्त आहेत, तर फायरमन जागेसाठी 544 जागा रिक्त आहेत. एकुण जागा 1793 इतक्या रिक्त जागा आहेत.
मान्यता प्राप्त बोर्डातून १० वी पास उमेदवार या जागेसाठी अर्ज करु शकतात. ट्रेड्समन पदासाठी संबंधित ट्रेडचा आयटीआय डिप्लोमा असणे अनिवार्य आहे. पात्र उमेदवाराचे वय 26 फेब्रुवारी 2023 रोजी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष पर्यंत असणे बंधनकारक आहे.
ट्रेड्समन आणि फायरमन पदासाठी योग्य उमेदवारांना दोन चरणांमध्ये होणार आहे. यात फिजीकल टेस्ट आणि लिखित परीक्षा होईल. या पदासाठी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाणार आहे.
ट्रेडसमन मेट- लेव्हल-1 फायरमन अंतर्गत रु.18000 ते रु.56900, लेव्हल-2 अंतर्गत रु.19900 ते रु.63200.
असा करा अर्ज- पहिल्यांदा AOC च्या अधिकृत वेबसाइट aocrecruitment.gov.in ला भेट द्या. यानंतर मेन पेजवर लॉगिनवर क्लिक करा पुढ वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि नोंदणी करा. जनरेट केलेल्या क्रेडेन्शियल्सच्या मदतीने लॉग इन करा. पुढ ऑनलाइन अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा आणि फॉर्म भरा. पुढ तुम्ही फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि पुढील संदर्भासाठी ते तुमच्याकडे ठेवा.