Bank of Baroda SO Recruitment : बँक ऑफ बडोदामध्ये अनेक पदांवर मोठी भरती; पाहा कसा आणि कधीपर्यंत करता येणार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 08:33 AM2022-03-08T08:33:13+5:302022-03-08T08:42:50+5:30

Bank of Baroda SO Recruitment Notification 2022: ४ मार्चपासून अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पाहा कुठे आणि कसा करता येणार अर्ज.

Bank of Baroda SO Recruitment Notification 2022: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांना तसंच विविध बँक भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने रिस्क मॅनेजमेंट, एमएसएमई आणि कॉर्पोरेट क्रेडिट विभागांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

अधिसूचनेनुसार ४ मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसंच २४ मार्च पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofbaroda.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

डिजिटल फ्रॉड मॅनेजर, क्रेडिट ऑफिसर, क्रेडिट - एक्सपोर्ट/इम्पोर्ट बिझनेस आणि फॉरेक्स मॅनेजर, तसंच एक्विझिशन अँड रिलेशनशिप मॅनेजर या पदांसाठी सुमारे १०५ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

मॅनेजर डिजिटल फ्रॉडसाठी १५, क्रेडिट अधिकारी (एमएसएमई विभाग) एसएमजी/एस IV साठी १५, तसंच क्रेडिट अधिकारी (एमएसएमई विभाग) एसएमजी/एस III साठी २५ जागांवर भरती केली जाणार आहे.

याशिवाय क्रेडिट - निर्यात / आयात व्यवस्थापन (एमएसएमई विभाग) एसएमजी/एसआयवीसाठी 8, क्रेडिट - निर्यात / आयात व्यवस्थापन (एमएसएमई विभाग) एसएमजी/एसआयआय साठी १२, परकीय चलन - अधिग्रहण आणि संबंध व्यवस्थापक (कॉर्पोरेट क्रेडिट विभाग) MMG/SIII साठी १५, परकीय चलन - अधिग्रहण आणि संबंध व्यवस्थापक (कॉर्पोरेट क्रेडिट विभाग) एमएमजी/एसआयआयसाठी १५ जागांवर भरती केली जाईल.

बँक ऑफ बडोदानं निरनिराळ्या पदांसाठी निरनिराळी वयोमर्यादा निश्चित केली आहे. यामध्ये २४ वर्षांपासून ४० वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या www.bankofbaroda.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या करिअर सेक्शनमध्ये जावं लागेल.

त्या ठिकाणी असलेल्या ऑनलाइन अप्लाय या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ‘Recruitment of Specialist Officers In Bank of Baroda’ वर क्लिक करा. आपल्याला हवं असलेल्या पदानुसार रजिस्ट्रेशन करून अर्जासाठी आवश्यक शुल्क भरा.

आरक्षित श्रेणीच्या पुरुष उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर अन्य श्रेणीतील पुरुष उमेदवार आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरावं लागेल. परीक्षा शुल्क केवळ डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून भरता येऊ शकतं.