Business Idea: छोटेसे ऑफिस उघडा, पैसे कमवा! गाळा असला तरी चालेल; नोकरी मागणाऱ्यांची रांग लागेल... By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 11:30 AM 2022-11-15T11:30:30+5:30 2022-11-15T11:37:18+5:30
जर तुम्हाला कोणता नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर एक उत्तम पर्याय आहे. एक अशी आयडिया आहे, जी तुम्हाला चांगला इन्कम मिळवून देईलच परंतू याचबरोबर अनेकांना नोकरी देखील देता येणार आहे जर तुम्हाला कोणता नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर एक उत्तम पर्याय आहे. एक अशी आयडिया आहे, जी तुम्हाला चांगला इन्कम मिळवून देईलच परंतू याचबरोबर अनेकांना नोकरी देखील देता येणार आहे. हा व्यवसाय आहे सुरक्षा पुरविण्याचा म्हणजेच सुरक्षा रक्षक पुरविण्याचा. तुम्ही तुमची सिक्युरिटी एजन्सी सुरु करून उत्पन्नाबरोबरच नोकरी देणारे देखील ठरू शकता. (Security Agency Business)
आज शहरात प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटीची गरज लागते. एटीएम सेंटर असो की सोसायटी किंवा एखादे दालन, शोरुम, नवे कंस्ट्रक्शन. सर्वत्र सिक्युरिटी गार्ड्स लागतात. आठ ते १२, १६ तासांची ड्युटी असते. अनेकठिकाणी या सुरक्षा रक्षकांची गरज असते. त्यासाठी लोक पैसेही मोजण्यास तयार असतात.
आजकाल मोठ्या शहरांच्या आजुबाजुला नवशहरे उदयास येत आहेत. जिथे तिथे इमारती उभ्या राहत आहेत. प्रत्येक इमारतीत एकतरी सिक्युरिटी असतोच. दरोडेखोरांपासून सुरक्षा नाही परंतू निदान छोट्या मोठ्या चोऱ्यांपासून किंवा पाणी सोडायचे असेल, लाईट लावायच्या असतील काही नादुरुस्त झाले तर आदी पाहणारा हा सिक्युरिटी गार्डच असतो. यामुळे हा धंदा बंद होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत.
सिक्युरीटीला पगारही चांगला दिला जातो. लोक त्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत. यामुळे तुम्हाला तुमचे कमिशन घेऊन सिक्युरिटीला पैसे देता येतात. हे सिक्युरीटी गार्ड कंत्राटी असतात. अनेकजण बाहेरगावाहून आलेले असल्याने सलग दोन दोन शिफ्ट करतात. अनेकदा एकच सिक्युरिटी २४ तास असतो. यामुळे त्यातही जास्त पैसे सुटतात.
एजन्सीचे रजिस्ट्रेशन... सिक्युरिटी गार्ड एजन्सी सुरु करण्यासाठी तुम्हाला कमीतकमी भांडवल लागते. एक केबिन म्हणजेच गाळा किंवा घर असेल तरी चालेल. जर मोठ्या प्रमाणावर हा व्य़वसाय सुरु करायचा असेल तर तुम्हाला मित्र, नातेवाईकांची मदत घ्यावी लागेल. यासाठी तुम्हाला तुमची कंपनी स्थापन करावी लागते. तसेच ईएसआयसी किंवा पीएफ रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.
जर तुम्ही सिक्युरिटी एजन्सीमध्ये १० लोकांना कामावर ठेवत असाल तर ईएसआयसी रजिस्ट्रेशन आणि २० पेक्षा जास्त लोकांना कामावर ठेवले तर पीएफसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. याशिवाय जीएसटी रजिस्ट्रेशनसह कंपनीला लेबर कोर्टात रजिस्टर करावे लागणार आहे.
खाजगी सुरक्षा एजन्सी नियमन कायदा 2005 अंतर्गत लायसन जारी केले जाते. त्याला PSARA या नावानेही ओळखले जाते. या परवान्याशिवाय खाजगी सुरक्षा एजन्सी चालवता येत नाही. यासाठी काही अटी आहेत.
अर्जदारावर कोणताही फौजदारी खटला नसावा, आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा व भारतीय नागरिक असावा. तसेच अर्जदाराची पोलिस पडताळणी केली जाते. याशिवाय एजन्सी उघडण्यासाठी राज्य नियंत्रण प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या संस्थेकडून सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षणासाठी करार करावा लागेल.
लायसन फी... सुरक्षा रक्षक एजन्सीचे लायसन मिळविण्यासाठी परवाना शुल्क भरावे लागते. ते वेगवेगळे आहे. एका जिल्ह्यात सुरक्षा एजन्सीचा परवाना घ्यायचा असेल तर सुमारे 5,000 रुपये, 5 जिल्ह्यांमध्ये सेवा देण्यासाठी 10,000 रुपये, राज्यभरातील सेवेसाठी २५ हजार रुपये भरावे लागतात.