CRPF Recruitment 2021: सीआरपीएफमध्ये पॅरामेडिकल स्टाफसाठी २४३९ जागांची भरती; मुलाखतीनं होणार निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 01:16 PM2021-08-15T13:16:59+5:302021-08-15T13:26:42+5:30

CRPF Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. जाणून घेऊयात या नोकरीबाबत सारंकाही...

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) देशातील विविध सीएपीएफ रुग्णालयांमध्ये पॅरामेडिकल स्टाफसाठी भरती निघाली आहे. यात एकूण २४३९ जागांवर भरती केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांना crpf.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांची निवड थेट मुलाखतीतून होणार आहे.

उमेदवारांच्या मुलाखती १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घेतल्या आहेत. सीआरपीएफकडून करार तत्वावर विविध रुग्णांलयांमध्ये पॅरामेडिकल स्टाफसाठी भरती राबवली जात आहे.

इच्छुक उमेदवारांना ठरवून दिलेल्या वेळेतच मुलाखतीला उपस्थित राहण्याची काळजी बाळगावी लागणार आहे. यात उमेदवारांना त्यांची सर्व अधिकृत कागदपत्र सोबत घेऊन यावी लागणार आहेत. यात फोटो, पीपीओ, पदवी प्रमाणपत्र, अनुभवाचं प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.

आसाम रायफल्समध्ये १५६ जागा, सीमा सुरक्षा दलात ३६५, केंद्रीय राखीव सुरक्षा पदलात १५३७, भारत-तिबेटियन सीमा पोलीस १३० जागा आणि सेवा निवड बोर्डात २५१ जागांवर भरती केली जाणार आहे.

उपरोक्त पदांसाठी सीएपीएफ, एआर आणि सशस्त्र दलातील सेवानिवृत्त उमेदवार देखील अर्ज दाखल करू शकतात. यात उमेदवाराचं वय ६२ वर्षांपेक्षा कमी असणं अनिवार्य आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलातील पदांवरील भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची निवड थेट मुलाखतीतून केली जाणार आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

त्यामुळे या पदांवर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी तातडीनं अर्ज दाखल करून १३ ते १५ सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत मुलाखतीसाठी तयार राहावं लागणार आहे.