India Post Jobs: भारतीय टपाल खात्यात २,३५७ पदांवर भरती; उद्याचा अर्जाचा शेवटचा दिवस, १० वी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 04:13 PM2021-08-18T16:13:31+5:302021-08-18T16:16:58+5:30

India Post Recruitment 2021: भारतीय टपाल खात्यात नोकरीची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती...

भारतीय टपाल खात्याच्या पश्चिम बंगाल सर्कल ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याची उद्याची शेवटची तारीख आहे. यात इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज दाखल करू शकणार आहेत.

इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. एकूण २३५७ जागांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना टपाल खात्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करता येणार आहे.

टपाल खात्यातील या भरतीसाठीचं अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २० जुलै २०२१ रोजीच सुरू झाली होती. अर्ज दाखल करण्यासाठीचा उद्याचा शेवटचा दिवस आहे.

इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवार देखील या नोकरीसाठी अर्ज दाखल करू शकणार आहेत. याशिवाय कमीत कमी ६० दिवसांचा कॉम्प्युटर कोर्स केलेला असणं देखील गरजेचं आहे.

उमेदवाराचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक तर ४० वर्षांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. याशिवाय एससी, एसटी, ओबीसी, पीडब्ल्यूडी, पीडब्ल्यूडी ओबीसी आणि पीडब्ल्यूडी एससी प्रवर्गासाठी उमेदवारांना अनुक्रमे ५,३,१०, १३ आणि १५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांना appost.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करता येणार आहे.

अर्ज दाखल केल्यानंतर त्याची ऑनलाइन प्रिंट आऊट काढता येणार आहे. त्याचा भविष्यात उपयोग होऊ शकतो.