तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 04:39 PM2024-11-29T16:39:38+5:302024-11-29T16:57:17+5:30

work office culture: कोण कशासाठी वापर करेल सांगता येत नाही. ऑफिसमधील कोणालाच सांगू नयेत.

अनेकदा आपण ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत खुपच मोकळेपणाने बोलतो. आपल्या अडीअडचणी, अनुभव आदी गोष्टी सांगतो. अनेकदा गॉसिपिंग देखील करतो. पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या ऑफिसमधील कोणालाच सांगू नयेत. त्याचा कोण कशासाठी वापर करेल सांगता येत नाही.

ऑफिसमध्ये पैशांशी संबंधीत किंवा नोकरीशी संबंधीत तक्रारींवर बोलणे कधीही टाळावे. यामुळे नोकरीत समस्या निर्माण होऊ शकते किंवा समोरचा तुमची किंमत करू शकतो.

नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी धर्म आणि राजकारणाशी संबंधीत चर्चा करू नये. वेगवेगळ्या आवडी, मते असू शकतात. परंतू यामुळे संबंध बिघडू शकतात.

जर तुम्ही नोकरीवर खूश नसाल तर इतर लोकांशी यावर चर्चा करू नका. सहकारी तुमच्या नाराजीत भर घालण्याची शक्यता जास्त असते.

सहकाऱ्यांविषयी इतरांकडे तक्रारी करणे हे देखील सोडा. यामुळे ऑफिसचे वातावरणही खराब होऊ शकते. तसेच गैरसमजही पसरू शकतात.

तुमच्या आवडी-निवडीही सांगू नका, यामुळे तुमच्या सहकाऱ्यांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला पगार किती, पॅकेज किती याबाबतही बोलू नका. कारण प्रत्येकाचा पगार, त्याला मिळणाऱ्या सुविधा वेगवेगळ्या असतात. यामुळे कमी जास्त पणावरून नाराजी पसरू शकते.

तुमचे वैवाहिक जीवन कसे आहे, नातेसंबंध, त्यातील अफेअरबाबत ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी बोलणे टाळा, ते अव्यावसायिक मानले जाते.

नोकरी सोडायचा विचार करत असाल तर त्याबाबत कोणाशी बोलू नका. कारण अशाने तुमची तिथली संधी धोक्यात येऊ शकते किंवा इथली जबाबदारीही धोक्यात येऊ शकते.

ऑफिसमध्ये कितीही नाही म्हटले तरी प्रतिस्पर्धी हा असतोच. यामुळे तुम्ही भविष्यात कामाविषयी काय प्लॅन करणार आहात हे देखील उघड करू नका. नाहीतर तुमचा प्लॅन तो व्यक्ती अवलंबून पुढे जाऊ शकतो. तसेच स्पर्धेची भावना तीव्र होऊ शकते.

आणखी एक महत्वाचे तुमच्या बॉसबाबत चुकूनही इतर सहकाऱ्यांकडे तक्रार करू नका. कोण कसा याचा फायदा घेईल सांगता येत नाही, तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते.

टॅग्स :नोकरीjob