नोकरीची सुवर्णसंधी! OYO मध्ये ३०० जागांवर भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 12:14 PM2021-08-23T12:14:51+5:302021-08-23T12:20:11+5:30

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. OYO कंपनीत नोकर भरती निघाली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती...

ओयो (OYO) या देशातील महत्वाच्या हॉस्पिटॅलिटी फर्मनं जवळपास ३०० जणांना नोकरी देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे हॉटेल क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

OYO कडून ३०० जागा नव्याने भरल्या जाणार असून टेक प्रोफेशनल्ससाठी मोठी संधी ठरणार आहे. यात पुढील सहा महिन्यांमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत.

सर्वसामान्य कर्मचाऱ्यापासून ते सिनिअर लीडरपर्यंतच्या विविध पदांवर ही भरती केली जाणार आहे.

मशिन लर्निंग, डेटा इंजिनिअरिंग आणि इन्फॉरमेशन सिक्युरिटी, अँड्रॉइड आणि आयओएस डेव्हलपर्स या कामांसाठी नोकर भरती केली जाणार आहे.

तंत्रज्ञानाची मदत घेऊन ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यासाठी ओयोकडून काही महत्वपूर्ण बदल केले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ही नोकर भरती केली जाणार आहे.

ओयो कंपनीकडून कॅम्पस प्लेसमेंटला देखील सुरुवात झाली आहे. यात आतापर्यंत ५० युवा प्रोफेशनल्सना नोकरी देण्यात आली आहे.

कंपनीकडून लवकरच आणखी काही विद्यापीठांतून १५० नव्या तरुणांना नोकरी दिली जाणार आहे.

नोकर भरती पूर्ण झाल्यानंतर ओयो कंपनी लवकरच एक नवा प्रोजेक्ट घेऊन बाजारात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. यासाठीची तयारी कंपनीनं सुरू केली आहे. कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये वाढ करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

Read in English