SBI Clerk Recruitment 2021: स्टेट बँकेत ५,२३७ जागांसाठी मोठी भरती; अर्जासाठी उरले अखेरचे काही दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:12 PM2021-05-11T18:12:10+5:302021-05-11T18:21:28+5:30

Job Alert : ज्युनिअर असोसिट्सच्या पदांसाठी भरती सुरू. उरलेत शेवटचे काही दिवस. पाहा कसा करता येईल अर्ज

SBI Clerk Recruitment 2021: जर तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय स्टेट बँकेनं मोठी भरती प्रक्रिया सुर केली आहे.

स्टेट बँकेनं क्लर्क भरती २०२१ (SBI Clerk Recruitment 2021) साठी नोटिफिकेशन जारी केलं आहे.

यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २७ एप्रिलपासूनच सुरू करण्यात आली आहे. योग्य उमेदवार स्टेट बँकेची अधिकृत बेवसाईट sbi.co.in च्या माध्यमातून ज्युनिअर असोसिएट्स पदासाठी अर्ज करू शकता.

स्टेट बँक ऑफ इंडिया क्लर्क भरती २०२१ च्या माध्यमातून ज्युनिअर असोसिएट्सच्या एकून ५२३७ पदं भरणार आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मे निश्चित करण्यात आली आहे.

या भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती मिळवण्यासाठी स्टेट बँकेच्या वेबसाईटवर माहिती पाहता येईल.

यासाठी अर्ज जमा करण्याची तारीख १७ मार्च निश्चित करण्यात आली आहे. तर २६ मार्च २०२१ रोजी प्री एक्झाम ट्रेनिंग कॉल लेटरसाठी निश्चित करण्यात आली आहे.

जून महिन्यात प्रिलिमिनरी एक्झाम होणार असून ३१ जुलै रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे.

१ एप्रिल २०२१ रोजी उमेदवाराचं वय कमीतकमी २ वर्षे आणि जास्तीत जास्त २८ वर्षे असणं आवश्यक आहे.

याशिवाय सरकारच्या सूचनांनुसार आरक्षित श्रेणीसाठी उमेदवारांना सूट मिळणार आहे.

निवड प्रक्रियेत सुरूवातीला एक परीक्षा आणि त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल. तसंच यासोबत ऑप्टेड स्थानिक भाषेचीही चाचणी घेण्यात येणार आहे.

१०० गुणांची सुरूवातीची परीक्षा ऑनलाइन ऑबजेक्टिव्ह असेल. एका तासाच्या परीक्षेची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे.

तीन भागांमध्ये इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमतेची परीक्षा घेतली जाणार आहे.

खुल्या प्रवर्गातील, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी ७५० रूपयांचं शुल्क भरावं लागणार आहे. खुल्या प्रवर्गातील, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी ७५० रूपयांचं शुल्क भरावं लागणार आहे.

याशिवाय एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्सएस, डीएक्सएस श्रेणीशी संबंधित उमेदवारांना शुल्क माफ करण्यात आलं आहे.