दानवेची गाडी सुसाट... डोळ्यावर गॉगल, गळ्यात गमछा अन् बुलेटची सवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:17 IST2022-06-16T16:07:18+5:302022-06-16T16:17:20+5:30

दानवेंच्या या वागणुकीमुळेच, आपल्यापणाच्या भावनेमुळेच त्यांच्या मतदारसंघावर त्यांची मोठी पकड आहे. आजही ते आपल्या धोतरवाल्या सहकाऱ्यांसोबत फिरताना दिसतात.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या भाषणामुळे, हटके स्टाईलमुळे आणि ग्रामीण बाज असल्याने नेहमीच चर्चेत असतात. त्यांची साधी राहणी आणि गावकडची बोली आजही त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येते.

दानवेंच्या या वागणुकीमुळेच, आपल्यापणाच्या भावनेमुळेच त्यांच्या मतदारसंघावर त्यांची मोठी पकड आहे. आजही ते आपल्या धोतरवाल्या सहकाऱ्यांसोबत फिरताना दिसतात.

दानवेंनी आज औरंगाबाद शहरातून बाईक रॅली काढली. यावेळी, स्वत: बुलेट चालवून त्यांनी या रॅलीचं नेतृत्व केलं. तसेच, संभाजीराजे यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनाचा 8 वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. त्या निमित्ताने माझ्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर शहरात भारतीय जनता युवा मोर्चाची "विकास तिर्थ बाईक रॅली" काढण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.

औरंगाबाद शहरात काढण्यात आलेल्या विकास तिर्थ बाईक रॅली ला युवकांचा आणि नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी युवकांना मार्गदर्शन केले व मोदी जींच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

चिखलठाणा ते मुकुंदवाडी परिसरातील या बाईक रॅलीमध्ये युवकांचा उत्साह वाखणण्याजोगा होता. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती होती.

विशेष म्हणजे हरिभाऊ बागडे त्यांच्या बुलेटवर पाठिमागे बसल्याचं फोटोत दिसून येत आहे. डोळ्यावर गॉगल, गळ्यात गमछा आणि बुलेटची सवारी करतानाचे फोटो दानवेंनी शेअर केले आहेत.

आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन त्यांनी फोटो शेअर करत कार्यक्रमाची माहिती दिली. या फोटोत दानवेंची हटके स्टाईल दिसून येते.