10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 04:39 PM2024-10-16T16:39:32+5:302024-10-16T16:45:49+5:30

Thief Mohammed Irfan : एका असा चोर ज्याच्या १० पत्नी आहेत, ६ गर्लफ्रेंड आहेत. एक पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहे, तर एक अभिनेत्री... इतकंच नाही, तर जग्वार कार आणि विमानातून फिरतो... या चोराला रॉबिन हूड ऑफ बिहार असं म्हटलं जातं.

मोठंमोठ्या चोऱ्या करणाऱ्या या चोराचे खरे नाव आहे मोहम्मद इरफान. त्याची एक पत्नी बिहारमधील सीतामढी जिल्हा परिषदेची सदस्य आहे. दुसरी एक पत्नी भोजपुरी अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री मुंबईत राहते.

ज्या शहरात इरफान चोरी करतो, तिथे आधी एखाद्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. तिच्या लग्न करतो. दोन वर्षापूर्वी गाझियाबादमधील कवीनगर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून जग्वार कारही जप्त केली होती. ही कार त्याच्या पत्नीच्या नावावर आहे.

पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली, तेव्हा त्याने दिलेली माहिती ऐकून पोलिसही चक्रावले होते. ज्या शहरात तो जातो तिथे तो गर्लफ्रेंड बनवतो. त्याची पहिली पत्नी सीतामढी जिल्हा परिषदची सदस्य आहे. इफान चोर असला तरी गावातील लोक त्याचा प्रचंड आदर करतात.

याचं कारण म्हणजे इरफानने गावाच्या बाहेर चोऱ्या केल्या. त्यातून जो पैसा आला, तो त्याने गावाच्या विकासासाठी खर्च केला. त्याने गावातील रस्त्यांचं काम केलं. गावात वीज आणली. त्यामुळेच त्याची पत्नी बिनविरोध निवडून आली.

इरफान चोऱ्या करण्यासाठी शहर ठरतो. तिथे दहा दिवस राहतो. मोठ्या घरांची रेकी करायचा. संधी मिळताच त्या घरातून लाखो रुपये लंपास करायचा. बिहारमधून दिल्लीला जाण्यासाठी तो जग्वार कार वापरायचा.

इरफान कोणत्याही शहरात गेला की, तिथे पंचतारांकित किंवा चांगल्या हॉटेलमध्ये राहायचा. कपड्यांचा शौकीन असलेला इरफान मुलींशी मैत्री करायचा. तो स्वतः चा परिचय उद्योगपती आर्यन खन्ना असा करून द्यायचा.