800 years old mughal period coins found in kaushambi two person arrested
खोदकामात २ युवकांना सापडला ८०० वर्ष जुना खजिना; बाजारात विकायला गेले अन्.... By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 01:18 PM2020-06-17T13:18:25+5:302020-06-17T13:23:17+5:30Join usJoin usNext उत्तर प्रदेशातील कौशांबी पोलिसांनी मुगलकालीन सिक्के मिळाल्यानंतर ते विकायला गेलेल्या २ युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. कौशांबीच्या भौतर गावात मुकेश पुरी नावाचे इसमाच्या घराचं बांधकाम सुरु होतं. घराचा पाया खोदताना त्यावेळी जमिनीत ८०० वर्ष जुना खजिना दोन मजुरांच्या हाती लागला. हा खजिना म्हणजे मुगलकालीन सिक्के होते, मुकेश पुरी यांनी हे सिक्के विकायला अझुवा बाजारात गेले. त्याठिकाणी सराफा व्यापारी अर्जुन सोनी यांना ते सिक्के दाखवले अर्जुन सोनी यांनी सिक्के पाहून भरवारी कस्बे याठिकाणी व्यापारी याची जास्त किंमत देतील असं सांगितले. त्यानंतर दोघं जण १७१ मुगलकालीन सिक्के विकण्यासाठी भरवारी बाजारात गेले होते. दरम्यानच्या काळात जेव्हा लोकांना याची भनक लागली. त्यातील काहींनी याची माहिती थेट पोलिसांना दिली. कोखराज ठाण्यातील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि एसओजीच्या टीमने ८०० वर्ष जुने मुगलकालीन सिक्के विकणाऱ्या तरुणांना अटक करुन सिक्के ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर आरोपींनी पोलिसांनी सांगितले की, मुगलकालीन सिक्के घराचं बांधकाम करताना खोदकामावेळी सापडले, सिक्के ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी ते पुरातत्व विभागाकडे परीक्षणासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करुन जेलमध्ये पाठवले आहे. या सिक्क्यांबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक अशोक कुमार यांनी सांगितले की, या दोघांकडून १७१ मुगलकालीन सिक्के जमा केले आहेत. या सिक्क्यांचे वजन ६ ग्रॅम आहे, हे विकण्याच्या तयारीत असताना यांना पकडलं आहे. पुरातत्व विभागाकडून या सिक्क्याचं परीक्षण होईल त्यानंतर याची खरी किंमत काय आहे याची माहिती मिळेल असं पोलिसांनी सांगितले आहे. पण पैशाच्या लालसापोटी या तरुणांना ऐतिहासिक खजिना विकणं महागात पडलं आणि जेलची हवा खावी लागली. टॅग्स :पोलिसPolice