Shraddha Walker Murder Case: पॉलिग्राफ चाचणीतून आफताब सहीसलामत सुटला? श्रद्धावरून २५० प्रश्न विचारले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 09:44 AM2022-11-30T09:44:17+5:302022-11-30T09:57:26+5:30

जर कवटीचा आकार श्रद्धाच्या चेहऱ्याशी जुळला तर तो कोर्टात महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर केला जाऊ शकतो. पण पोलिसांना कवटीच सापडलेली नाही.

श्रद्धा मर्डर केसमध्ये आता हळूहळू आफताबने खेळलेला गेम त्याच्यावरच उलटू लागला आहे. आफताबची पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण झाली आहे, या टेस्टमध्ये त्याला २५० प्रश्न विचारण्यात आले होते. यात आफताबने पूर्ण आत्मविश्वासाने उत्तरे दिली आहेत. यामुळे आफताबच्या या टेस्टचा निकाल काय येतो यावर पोलिसांचे पुढील फासे अवलंबून आहेत.

पोलिसांना आफताबच्या पॉलिग्राफिक टेस्टमध्ये सध्या तरी काही यश मिळालेले नाही. आफताबने गुन्हाचा सिक्वेन्स आणि पुरावे लपविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे पोलिसांना आता घटनाक्रम आणि पुरावे जुळवावे लागणार आहेत. १ डिसेंबरला आफताबची नार्को टेस्ट होणार आहे. यानंतरच त्याने काय खरे बोलला आणि काय खोटे बोलला याची माहिती मिळू शकणार आहे.

आफताबने पॉलिग्राफ टेस्टमध्ये प्रश्नांची जी उत्तरे दिली, तिच पोलिसांच्या चौकशीतही दिली होती. यामुळे पोलिसांच्या हाती काही लागलेले नाही, असे सुत्रांनी सांगितले. आफताबची नार्को टेस्टसाठी ५ डिसेंबरची तारीखही रिझर्व करण्यात आली आहे. २९ नोव्हेंबरला त्याला पुन्हा एकदा रोहिणीला नेण्यात आले होते. तिथे त्याची साडे चार तास चाचणी घेण्यात आली. ही नार्को टेस्ट पूर्वीची चाचणी होती. नार्को टेस्टसाठी तो पूर्ण पणे फिट आढळला.

गुरुग्राम आणि छतरपूरच्या जंगलातून पोलिसांना आतापर्यंत ४-५ चाकू आणि कैची सापडली आहे. यातील दोन चाकू हे चॉपरसारखे मोठे आहेत. जंगलातून जी हाडे सापडली आहेत, त्यात कंबर, जांघ, हात आणि पायाची काही हाडे आहेत. यामुळे पोलिसांना काहीसा विश्वास वाटू लागला आहे.

पोलिसांना अद्याप श्रद्धाची कवटी सापडलेली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कवटी मिळाल्यानंतर त्याची सुपर इम्पोझिशन चाचणी घेण्याची तयारी पोलीस करत आहेत. जर कवटीचा आकार श्रद्धाच्या चेहऱ्याशी जुळला तर तो कोर्टात महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर केला जाऊ शकतो. आफताबला ड्रग्ज देण्याच्या प्रकरणात गुजरातमध्ये अटक करण्यात आलेला ड्रग्ज तस्कर फैजल मोमीन याची दिल्ली पोलीस चौकशी करू शकतात.

तो आफताबला ड्रग्ज पुरवायचा, असे फैजलने गुजरात पोलिसांना सांगितले आहे. परंतू आफताबने तिहार तुरुंगात एकदाही नशा करण्यासारखे वाटलेले नाहीय. सर्व कैदी अंमली पदार्थांचे व्यसनी आहेत, असे जेलमधील सुत्रांनी सांगितले. त्यांनी नशा केली नाही तर ते अस्वस्थ होतात. परंतू, आफताबमध्ये तसली काहीच लक्षणे दिसत नाहीएत. तो सामान्य माणसासारखा वागत आहे.

रोहिणी एफएसएल येथे व्हॅनवर हल्ला झाल्यानंतर सोमवारी रात्री मेहरौली पोलिसांनी त्याला प्रथम मेहरौली पोलीस ठाण्यात नेले. तिथून पोलिसांनी तुरुंगाच्या व्हॅनच्या पुढे आणि मागे सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. यानंतर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याला तिहार तुरुंगात आणण्यात आले. वाटेत हरिनगर पोलीस ठाण्यानेही त्यांना सुरक्षा पुरवली. तुरुंगात कोणीही हल्ला करू नये. यासाठी अधिक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

श्रद्धाच्या हत्येप्रकरणी त्याला फाशी झाली तरी त्याला त्याचा पश्चाताप होणार नाही, तो स्वर्गात गेल्यावर त्याला नायक मिळेल. इतकंच नाही तर श्रद्धासोबतच्या रिलेशनशिपदरम्यान 20 हून अधिक हिंदू मुलींशी त्याचे संबंध असल्याचेही त्याने सांगितले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे.