शेत विकून पतीनं पत्नीच्या नावावर जमा केले 39 लाख, खात्यात 11 रुपये सोडून महिला शेजाऱ्यासोबत फरार By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 07:30 PM 2021-08-25T19:30:57+5:30 2021-08-25T19:42:11+5:30
लग्नानंतर संबंधित पती-पत्नी अत्यंत आनंदात जगत होते. त्यांनी शहरात घर बांधण्याचे स्वप्नही पाहिले होते. यासाठी पतीने गावातील शेत विकले आणि आलेले सर्व पैसे पत्नीच्या खात्यात जमा केले. यावेळी, पत्नीच विश्वासघात करेल, असे त्यला कधीच वाटले नव्हते. लग्नानंतर, एक स्त्री आणि एक पुरुष एकमेकांच्या अगदी जवळ येतात. इथूनच सुरू होते दोघांमधील विश्वासाचे नाते. मात्र, या नात्यात दोघांपैकी एकाचा जरी विश्वास तुटला, तरी पती-पत्नीच्या या नात्यात दुरावा येण्यास वेळ लागत नाही. असाच काहीसा प्रकार घडलाय बिहारमध्ये. (After selling the farm, the husband deposited Rs 39 lakh in his wife's name, then The wife escaped with the neighbor with money)
लग्नानंतर संबंधित पती-पत्नी अत्यंत आनंदात जगत होते. त्यांनी शहरात घर बांधण्याचे स्वप्नही पाहिले होते. यासाठी पतीने गावातील शेत विकले आणि आलेले सर्व पैसे पत्नीच्या खात्यात जमा केले. यावेळी, पत्नीच विश्वासघात करेल, असे त्यला कधीच वाटले नव्हते.
एक दिवस पती कमानिमित्त दुसऱ्या राज्यात गेला. याच काळात पत्नीही शेजाऱ्यासोबत घर सोडून पळून गेली. एवढेच नाही, तर पतीने तिच्या खात्यात जमा केलेले 39 लाख रुपयेही तिने पसार केले आणि खात्यात फक्त 11 रुपये सोडले. हे सर्व जेव्हा पतीला समजले, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
ही घटना आहे बिहारची, येथील बिहटामधील कौडिया येथील रहिवासी असलेल्या ब्रिजकिशोर सिंह यांचा 14 वर्षांपूर्वी भोजपूरच्या बरहारा पोलीस ठाणे क्षेत्रातील बिंद गावच्या प्रभावतीसोबत विवाह झाला होता. ब्रिजकिशोर गावातच शेती करायचा. तो बिहटा येथे भाड्याच्या घरात राहत होता. याच काळात तो शेती सोडून गुजरातमध्ये काम करण्यासाठी गेला होता.
ब्रिजकिशोर गुजरातमध्ये काम करून आपल्या पत्नीच्या खात्यात पैसे पाठवत असे. याच पैशाने त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. दरम्यान, एका शेजारच्या व्यक्तीशी त्याच्या पत्नीची जवळीक वाढली आणि हळूहळू दोघेही प्रेमात पडले.
दोघांच्या प्रेमाबद्दल पती ब्रिजकिशोर पूर्णपणे अनभिज्ञ होता. पतीला फसवून ती संबंधित तरुणाला भेटायलाही जात. याच काळात या दोघांत शारीरिक संबंधही झाले. या प्रकरणाची कुणाला भनकही लागली नाही. ब्रजकिशोरला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
मुलांच्या भविष्यासाठी विकलं शेत - मुलगा आणि मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी ब्रिजकिशोरने शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्याला शहरात स्थायिक होण्यासाठी पैशांची गरज होती, यासाठी त्याने गावातील शेतही विकले. शेत विकल्यावर त्याला सुमारे 39 लाख रुपये मिळाले, जे त्याने बायकोच्या खात्यात जमा केले होते. पण त्याला काय माहित, की त्याची बायको त्याला अशा प्रकारे फसवून दुसऱ्यासोबत पळून जाईल.
ब्रिजकिशोर जेव्हा गुजरातवरून परतला, तेव्हा घराला कुलूप होते. पत्नी घरी नव्हती. यावर त्याने घरमालकाकडे चौकशी केली, तेव्हा घरमालकाने त्याला, त्याची पत्नी प्रभावती आपल्या मुलीला घेऊन येथून निघून गेल्याचे सांगितले.
यानंतर, ब्रजकिशोरने सर्व नातेवाईकांकडे पत्नी आणि मुलांसंदर्भात चौकशी केली. ब्रिजकिशोरला कसे तरी मुलाबद्दल समजले. तेव्हा त्याने त्याला घरी आणले. यातच, ब्रिजकिशोरने पत्नीचे खाते चेक केले, तेव्हा तर त्याला धक्काच बसला. खात्यात केवळ 11 रुपयेच शिल्लक होते, बाकीचे पैसे गायब होते.
प्रभावतीनं प्रियकराच्या खात्यात ट्रान्सफर केले 26 लाख रुपये - खात्यात पैसे नसल्याने धक्का बसलेल्या ब्रिजकिशोरने थेट पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तपासादरम्यान, प्रभावतीचे एका तरुणासोबत अफेअर होते. तिने 26 लाख रुपये देहरी येथील एका व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर केले आहेत. तसेच 13 लाख रुपये चेकद्वारे काढले आहेत, असे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.