Aryan Khan: आर्यन खानच्या जेलमधील वागण्यानं पोलीस अधिकारी चिंतेत; शाहरुख खानचंही टेन्शन वाढलं By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 12:02 PM 2021-10-24T12:02:07+5:30 2021-10-24T12:08:43+5:30
Mumbai Cruise Rave Party: मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रुझवर NCB ने धाड टाकून ८ जणांना अटक केली होती. त्यात शाहरुखचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. शाहरुख खान(Shahrukh Khan) चा लाडका आर्यन खान(Aryan Khan) सध्या मुंबई क्रुझ रेव्ह पार्टी ड्रग्ज प्रकरणात(Mumbai Cruise Rave Party) आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे. शाहरुखच्या अथक प्रयत्नानंतरही आर्यनला जेल बाहेर काढणं कठीण झालं आहे.
३० ऑक्टोबरपर्यंत आर्यन न्यायालयीन कोठडीत आहे. शाहरुखच्या मन्नतमध्ये राहणाऱ्या आर्यनला जेलमधील जेवणं जात नाही. पिण्याचं पाणीही गोड लागत नाही. शाहरुखचा मन्नत बंगला जवळपास ३५० कोटींचा असून त्यात अनेक सोयीसुविधा आहेत.
मन्नतमध्ये येणारा त्याठिकाणची सुविधा पाहून चक्रावतो असं बोललं जातं. याच वातावरणात वाढलेल्या आर्यन खानला जेलमध्ये राहणं कठीण होत आहे. आर्थर रोड जेलमध्ये बंद असलेला आर्यन खान जेलमध्ये सारखा रडत आहे. जेवत नाही कारण त्याला वॉशरुममध्ये जायचं नाही.
जेलमध्ये बंद आर्यन खानबाबत प्रत्येक छोट्या गोष्टी बाहेर येत आहेत. जेलमध्ये बंद असलेल्या कैद्यांपैकी कुणी सांगितले की, आर्यन खान रडत असतो. आर्यन काही खात नसल्याने वॉशरुमला जात नसल्याने जेलमधील स्टाफ त्याच्या आरोग्याला घेऊन चिंतेत आहे.
आर्यनला जेलचं जेवण आवडत नसल्याने केवळ बिस्किट खाऊन तो पोट भरत आहे. स्टार किड असल्याने आर्यनला कुठलीही विशेष सुविधा जेलमध्ये दिली जात नाही. इतर सामान्य कैद्यांप्रमाणे आर्यनला वागणूक दिली जात आहे. जेलमधील इतर कैद्यांना जो नियम आहे तोच नियम आर्यनला पाळावा लागत आहे.
इतर कैद्यांना जे जेवण दिलं जातं तेच आर्यनला दिलं जात आहे. परंतु तो ते खात नाही. जर कँटिनमधून त्याला काही खरेदी करायचं असेल तर तो खरेदी करु शकतो. ज्यासाठी घरच्यांनी आर्यनला ४५०० रुपये मनी ऑर्डर पाठवली आहे. अलीकडेच शाहरुखने आर्यनला ४५०० रुपये दिले आहेत.
गुरुवारी २१ ऑक्टोबरला अभिनेता शाहरुख खान त्याचा मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलला गेला होता. याठिकाणी माध्यमांच्या प्रतिनिधींनी शाहरूखला घेरलं होतं. शाहरुख खान आर्यनला भेटायला गेला तेव्हा तो भावूक झाला परंतु त्याने मुलाला धीर देत लवकरच जामीन मिळेल असा विश्वास दिला.
NCB अधिकारी गुरुवारी शाहरुखच्या मन्नत यांच्या बंगल्यावर पोहचले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी शाहरुखच्या घरात सर्च केले. एनसीबी अधिकाऱ्यांनी शाहरुखला नोटीस बजावली. त्यात आर्यन खानचे संबंधित कागदपत्रे, एनसीबीला सोपवण्याच्या सूचना दिल्या.
तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला भेटण्यासाठी शाहरुखला विशेष ट्रिटमेंट दिली गेली नाही. भेटीच्या वेळी आर्यन खान आणि शाहरुख यांच्यामध्ये एक ग्रिल आणि काचेची भिंत होती. असे कोरोनामुळे करण्यात आले होते. शाहरुख आणि आर्यन हे इंटरकॉमवर बोलले. यावेळी 2 रक्षकही तेथेच उपस्थित होते.
आपल्याला तुरुंगातील अन्न पसंत नाही, असे आर्यन खानने वडिलांना, म्हणजेच शाहरुख खानला सांगितले. शाहरुखही यावेळी अत्यंत चिंतीत दिसत होता. घरचे अन्न देण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे तुरुंगाधिकाऱ्यांनी शाहरुखला सांगितले आहे.