Bank Loan Fraud: सावधान! तुमच्या नावावर कोणीही कर्ज काढू शकते; असे शोधा नाहीतर... By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 01:20 PM 2022-03-10T13:20:49+5:30 2022-03-10T13:27:23+5:30
Bank Loan without your concern: तुमच्या नावावर कोणी कर्ज घेऊ शकते का, हे प्रत्येकाला अशक्य वाटतं. मात्र, अलीकडेच, कर्ज देणाऱ्या संस्थेने पॅन कार्ड तपासली असता अनेकांच्या नावावर अगोदरच कर्ज असल्याचे समोर आले. मुंबई : तुमच्या नावावर कोणी कर्ज घेऊ शकते का, हे प्रत्येकाला अशक्य वाटतं. मात्र, अलीकडेच, कर्ज देणाऱ्या संस्थेने पॅन कार्ड तपासली असता अनेकांच्या नावावर अगोदरच कर्ज असल्याचे समोर आले. वाईट बाब म्हणजे यातील काही कर्ज थकीत होते. यात या संबंधितांचा काहीही दोष नसताना हप्ते थकल्याने क्रेडिट स्कोअर खराब झाला. यामुळे आपल्या नावावर कोणी कर्ज तर घेतले नाही ना घेतले, हे वारंवार तपासून पाहिले पाहिजे...
फसवणूक झाली तर तक्रार कशी करावी तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये तुम्हाला संशयास्पद बाबी आढळल्यास या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी वेळ वाया घालवू नका. तुम्ही जितका उशीर कराल तितके जास्त आर्थिक नुकसान होईल.
या प्रकरणात एका व्यक्तीने तत्काळ कारवाईसाठी पावले उचलली असता त्याचे पॅनकार्ड त्या कर्जामध्ये डीलिंक करण्यात आले आणि क्रेडिट स्कोअर ७७६ वरून ८३० वर गेला. त्यामुळे फसवणूक प्रकरणात तत्काळ तक्रार दाखल करणे आवश्यक ठरते.
क्रेडिट स्कोअर नियमित तपासा तुमच्या पॅनवर काय चालले आहे ते तपासण्याचा जलद मार्ग म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर तपासणे.
तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमच्या पॅनशी संबंधित सर्व कर्जाचे तपशील दिलेले असतात.
किती कर्ज घेतले, कोणत्या स्वरूपात, केव्हा, पेमेंट वेळेवर झाले की नाही, कर्जाची स्थिती काय आहे, हे सर्व त्यामध्ये असते.
जर तुमच्या पॅनवर फसवणूक करून कर्ज घेतले गेले असेल तर ते देखील त्यामध्ये दिसेल. त्यामुळे तुम्ही क्रेडिट स्कोअर नियमितपणे तपासणे आवश्यक आहे.
यातून मार्ग कसा काढायचा अशा प्रकरणामध्ये कर्ज देणारा तुमच्या मागण्या मान्य करण्यास तयार नसल्यास तुम्ही बँकिंग लोकपालाकडे तक्रार दाखल करू शकता.
येथेही तुम्हाला न्याय न मिळाल्यास तुम्ही ग्राहक न्यायालय किंवा स्थानिक सायबर क्राइम युनिटमार्फत आपली तक्रार दाखल करू शकता.
ही बाब तुम्ही क्रेडिट ब्युरोच्या निदर्शनास आणून देण्याची गरज आहे. ते तुमच्या क्रेडिट स्कोअरबाबतच्या त्रुटी सुधारू शकतात.
मात्र, जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लागत नाही तोपर्यंत लढा देण्यासाठी मानसिकदृष्ट्या तुम्ही तयार असणे आवश्यक आहे.
परस्पर तुमच्या नावाने कर्ज काढले गेले असेल तर हे कायदेशीर आणि फसवणूक या दोन्ही प्रकारात मोडते. कर्जे तुमच्या पॅनशी जोडलेली असतात. त्यामुळे आपल्या नावाने कोणीही कर्ज घेतले तरी ते पॅनकार्डमुळे समजू शकते. या फसवणूक प्रकरणात तुमच्या परवानगीशिवाय आणि पडताळणीशिवाय कर्ज मंजूर करण्यात आलेली असतात. जर तुम्ही ते कर्ज भरले नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्हाला नंतर कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात.