'या' सुंदर ललनांचे गुन्हे पाहून धक्का बसेल! By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 07:19 PM 2019-04-03T19:19:37+5:30 2019-04-03T19:22:20+5:30
ऍमेंडा नॉक्स- इटलीमध्ये राहणाऱ्या ऍमेंडानं 2007 मध्ये तिची रुममेट मेरेडिथ केर्चेरची हत्या केली होती. त्यात ती सुरुवातीला दोषी आढळली. मात्र त्यानंतर दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयानं तिची निर्दोष मुक्तता केली.
मिंडी संघेरा- तुरुंगात जाण्याआधी मिंडी बर्मिंगहॅम विद्यापीठाची डेंटल स्टुडंट होती. मिंडीनं तिच्या प्रियकराच्या गर्भवती पत्नीची अतिशय निर्घृण हत्या केली. त्यात ती दोषी आढळली.
स्टिफनी बौडेन- कॅनडाची रहिवासी असलेल्या स्टिफनीला 2017 मध्ये न्यायालयानं 90 दिवसांची शिक्षा सुनावली. 39 घरफोड्या केल्याप्रकरणी तिला तुरुंगवास भोगावा लागला. याशिवाय तिच्याविरोधात अवैधपणे 9 शस्त्रं बाळगल्याचा आरोपदेखील सिद्ध झाला.
हेली वे- पेशानं शिक्षिका असलेल्या हेलीला 17 डिसेंबर 2015 रोजी अटक करण्यात आली. दोन विद्यार्थ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिच्यावर होता. हे दोन्ही विद्यार्थी 17 वर्षांचे होते. टेक्सासमध्ये अल्पवयीन मुलांशी शारीरिक संबंध ठेवणं गुन्हा मानला जातो.
एस्टिबालिझ करांझा- एका आईस्क्रीम पार्लरची मालकीण असलेल्या एस्टिबालिझवर दुहेरी खुनाचा आरोप होता. तिनं तिच्या पतीसोबतच प्रियकराचीदेखील हत्या केली. यामध्ये ती दोषी आढळली. तिनं दोघांच्या मृतदेहांचे तुकडे करुन ते आईस्क्रीमच्या फ्रिजमध्ये ठेवले.