धक्कादायक! पाचव्या मुलाच्या इच्छेपोटी बनला सैतान, 8 वर्षांच्या मुलीचा डोळा काढला; ताईत करून बायकोला घातला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 09:59 PM2021-08-09T21:59:44+5:302021-08-09T22:10:10+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी दिलीपच्या पत्नीचा गर्भपात झाला होता. मात्र, यावेळी त्याला कोणत्याही परिस्थितीत पत्नीचा गर्भपात नको होता. यामुळे त्याने आपली समस्या आपल्या मित्रांना सांगितली अन्... (Brutally murdered 8 year old girl took out eyes and made amulets)

बिहारमधील मुंगेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 8 वर्षांच्या मुलीचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी जो खुलासा केला, तो जाणून, तुम्हाला जबरदस्त धक्का बसेल. यासंदर्भात, पोलिसांनी दावा केला आहे, की अंधश्रद्धेतून संबंधित मुलीची हत्या करण्यात आली आणि तिचा डोळा काढून त्याचे ताईत बनवण्यात आले. (Bihar 5th time pregnancy Brutally murdered 8 year old girl took out eyes and made amulets) (सांकेतिक फोटो)

पाचव्या अपत्याच्या इच्छेपोटी सैतानी कृत्य - ही घटना मुंगेर जिल्ह्यातील सफियाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मुंगेरचे एसपी जेजे रेड्डी यांनी या घटनेसंदर्भात जे सांगितले ते अत्यंत धक्कादायक आहे. रेड्डी यांनी सांगितल्यानुसार, रामनगरच्या पदम गावातील रहिवासी दिलीप कुमारने पाचव्या अपत्याच्या इच्छेपोटी हे सैतानी कृत्य केले आहे. (सांकेतिक फोटो)

मित्रांनी दिला होता सल्ला - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी दिलीपच्या पत्नीचा गर्भपात झाला होता. मात्र, यावेळी त्याला कोणत्याही परिस्थितीत पत्नीचा गर्भपात नको होता. यामुळे त्याने आपली समस्या दशरथ आणि तन्वीर या आपल्या मित्रांना सांगितली. (सांकेतिक फोटो)

यावर तनवीरने, खगरियामधील मधुरा गावचा रहिवासी असलेल्या परवेझ आलमशी दिलीपचा संपर्क करून दिला. यानंतर, गर्भपात टाळण्यासाठी परवेझने दिलीपला एका मुलीच्या डोळ्याचे ताईत करून ते पत्नीला घालण्याचा सल्ला दिला. (सांकेतिक फोटो)

8 वर्षांच्या मुलीची निर्दयीपणे हत्त्या - सफियाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी एक आठ वर्षांची मुलगी गंगेच्या काठावरून आपल्या वडिलांजवळून पुन्हा आपल्या घरी जात होती, याच वेळी दिलीप, दशरथ आणि तनवीर मुलीला आपल्यासोबत घेऊन गेले आणि तिची निर्दयीपणे हत्या केली. यानंतर त्यांनी तिचा एक डोळा काढला आणि तिला खगडिया येथे नेण्यात आले, असा आरोप आहे. (सांकेतिक फोटो)

पत्नीला घातला मुलीच्या डोळ्यापासून बनवलेला ताईत - यानंतर आरोपींनी मुलीचा काढलेला डोळा जाळला आणि त्याच्या राखेपासून ताईत बनवले आणि ते दिलीपच्या पत्नीला घालण्यात आले. याप्रकरणी जादूटोना करणाऱ्या परवेझसह चौघांना अटक करण्यात आली असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. (सांकेतिक फोटो)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सफियाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावाजवळच एका वीटभट्टीच्या नजीक संबंधित मुलीचा छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह गुरुवारी सकाळच्या सुमारास सापडला. हा मृतदेह एका झाडाखाली आढळून आला होता. या मुलीचा उजवा डोळा काढण्यात आला होता, तर डाव्या डोळ्याला इजा करण्यात आलेली होती. मुलीच्या हाताच्या बोटांनाही गंभीर दुखापत झाली होती. (सांकेतिक फोटो)

तत्पूर्वी, बलात्कार करून हत्या करण्यात आली असावी, असा कुटुंबीयांचा अदाज होता. मात्र, पोस्टमार्टम अहवालात बलात्काराची पुष्टी झालेली नाही. (सांकेतिक फोटो)