Boy Slits Lover's Throat After Celebrating Her Birthday in Bangalore, Accused Arrested
मुलीनं बर्थ डे केक कापला अन् बॉयफ्रेंडनं तिचा गळा; पार्टीत रंगला हत्येचा थरार By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 09:24 PM2023-04-20T21:24:36+5:302023-04-20T21:27:24+5:30Join usJoin usNext तिने अगदी सिंड्रेलासारखे कपडे घातले होते. चेहऱ्यावरची चमक पाहण्यासारखी होती. तिला इतका आनंद झाला होता की तिच्या हसण्याने चेहऱ्यावरील सौंदर्यात आणखी भर पडली. आनंद का होईना, त्या दिवशी तिची बर्थडे पार्टी होती. तिच्या वाढदिवसाच्या आनंदात तिच्या प्रियकराने संपूर्ण घर सजवले होते. डान्स, म्युझिक, खाणेपिणे, मजा सर्वकाही होते. ती स्वतःला राजकुमारीपेक्षा कमी समजत नव्हती, पण आता तिच्यासोबत काय होणार आहे हे तिला माहीत नव्हते. ही कहाणी आहे बंगळुरूमधील नाव्याची. २४ वर्षीय नाव्या सरकारी नोकरी करायची आणि बंगळुरूच्या कांकणपुरा भागात कुटुंबासोबत राहत होती. ती प्रशांत नावाच्या मुलासोबत सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. प्रशांत बंगळुरूमध्ये एकटाच राहत होता त्यामुळे ती अनेकदा प्रशांतच्या घरी भेटत असे. ११ एप्रिलला नाव्याचा वाढदिवस होता. त्या दिवशी तिने तिच्या मित्रांसोबत पार्टी केली होती, पण त्या दिवशी प्रशांत बिझी होता त्यामुळे तो त्या पार्टीत गेला नाही. वाढदिवसाला प्रशांत न आल्याने नाव्या थोडी नाराज झाली होती. मग काय, नाव्याला समजवण्यासाठी प्रशांतने त्याच्या घरी पार्टी आयोजित केली. त्याने नाव्याला सांगितले की ३ दिवसांनी म्हणजेच १४ एप्रिलला तो तुझा वाढदिवस घरी थाटामाटात साजरा करेल. शुक्रवारी संध्याकाळी नाव्या प्रियकराच्या घरी पोहोचली. नाव्या जेव्हा प्रशांतच्या घरी पोहोचली तेव्हा तिथलं दृश्य पाहून तिला खूप आनंद झाला. प्रशांतने संपूर्ण घर सजवले होते. खाण्यापिण्यासह सर्व काही बाहेरून मागवले होते आणि मोठा केकही होता. प्रशांतवर थोडी रागावलेली नाव्या हे सगळं बघून तिचा राग विसरून गेली. तिला खूप आनंद झाला. प्रशांत नाव्याला केक कापायला सांगतो. ती केक कापत होती, वाढदिवसाचे म्युझिक वाजत होते आणि प्रशांत तिचा फोटो क्लिक करत होता. आत्तापर्यंत सगळं नॉर्मल होतं. दोघांनीही केक खाल्ला. केक कापल्यानंतर प्रशांत काही कामाच्या बहाण्याने स्वयंपाकघरात गेला. नाव्या अजूनही केकजवळ बसली होती. ती पार्टीचा पूर्ण आनंद घेत होती. त्यानंतर प्रशांतने स्वयंपाकघरातून चाकू आणला. नाव्याला काही समजण्यापूर्वीच त्याने त्या धारदार चाकूने तिच्यावर हल्ला केला. प्रशांतने चाकूने नाव्याचा गळा कापला आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. थोड्याच वेळात नाव्याचा जीव गेला. प्रशांतने नाव्यासोबत असा भयंकर प्लॅन का रचला हा प्रश्न होता. दोघे ६ वर्षे एकत्र होते, एकमेकांवर प्रेम करत होते. दोघेही दूरचे नातेवाईक होते. दोघांच्याही घरच्यांना या नात्याची माहिती नव्हती, पण दोघांनी आधीच लग्नाचा बेत आखला होता. मग असं काय झालं की बर्थडे पार्टीच्या बहाण्याने प्रशांतने नव्याच्या हत्येची स्क्रिप्ट लिहिली. खरंतर प्रशांतला काही दिवसांपूर्वी नाव्याचे चॅट हाती लागले. त्यात ती दुसर्या कोणाशी तरी गप्पा मारत होती. याबाबत प्रशांत नाव्याशी बोलला तेव्हा दोघांचे भांडण झाले. नाव्याचे त्याच्याशिवाय अन्य कोणाशी तरी अफेअर असल्याचा प्रशांतला संशय होता. तो बऱ्याच दिवसांपासून नाव्यावर लक्ष ठेवून होता आणि त्याने नाव्याला मारण्याचा कट रचला. त्याला ही संधी नुकतीच नाव्याच्या वाढदिवशी मिळाली. संशयाच्या आधारे त्याने आपल्याच प्रेयसीची तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत हत्या केली. त्या दिवशी संध्याकाळी नाव्या घरी न परतल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. नाव्याचा फोन ट्रेस झाला आणि तिचे लोकेशन समजताच पोलीस प्रशांतच्या घरी पोहचले. घराचा दरवाजा उघडला असता आतमध्ये नाव्याचा मृतदेह होता. मात्र प्रशांत फरार झाला होता. पोलिसांनी २४ तासांत प्रशांतला अटक केली.