Brazil 15 year old girl dies while having sex with man in car after suffered fatal heart attack
कारमध्ये शारिरीक संबंध करताना १५ वर्षीय मुलीला आला Heart Attack; उपचारादरम्यान मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 10:55 AM2021-08-03T10:55:29+5:302021-08-03T10:57:48+5:30Join usJoin usNext ब्राजीलच्या साओ पाओलोमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे याठिकाणी एका कारमध्ये शारिरिक संबंध करत असताना १५ वर्षाच्या मुलीला ह्दयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे.(Girl Died While Having Sex in Car After Heart Attack) घटनास्थळी कुठल्याही खूणा आढळल्या नाहीत. मात्र मृत्यू संशयास्पद असल्याचं नोंदवत पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, साओ पाओलो इथं १५ वर्षीय मुलीचा २६ वर्ष युवकाशी लैंगिक संबंध करताना ह्दयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. २६ वर्षीय युवकाने पोलिसांना सांगितले की, मी आणि ग्रेबियाली आमच्या कारमध्ये शारिरीक संबंध बनवत होतो. त्यावेळी ग्रेबियाली अचनाक बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला साओ पाओलोच्या क्यूबाटोओमध्ये यूपीए जार्डिम मेडिकल हॉस्पटलमध्ये दाखल केले जिथं तिचा मृत्यू झाला. युवकाने सांगितले की, या काळात ग्रेबियालीचे होठ आणि त्वचा पिवळी पडली होती. तिचे हात वाकडे झाले होते. बेशुद्ध अवस्थेत तिला हॉस्पिटलला नेलं त्याठिकाणी डॉक्टरांनी ग्रेबियालीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी झाले. स्थानिक वेळेनुसार दुपारी १.३० च्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. स्टेट डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सिक्युरिटीनुसार, ग्रेबियालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिच्या योनीतून रक्त येत असल्याचं पाहिलं. पोलिसांना तिच्यासोबत काही हिंसा झाली आहे का अशी विचारणा केली. परंतु डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारे हिंसा झाल्याचे संकेत दिले नाहीत. युवकाने १५ वर्षीय ग्रेबियालीसोबत रिलेशन होण्याचा दावा केला. परंतु युवतीच्या घरच्यांनी पोलिसांना याबाबत काहीच माहिती नसल्याचं सांगितले. ग्रेबियाली कोणत्या आजाराने पीडित होती का? असं पोलिसांनी विचारलं असता कुटुंबाने नकार दिला ब्राजीलमध्ये सहमतीने शारीरिक संबंध बनवण्यासाठी १४ वर्ष असल्याचा नियम आहे. त्यामुळे २६ वर्षीय युवकावर कुठलाही आरोप पोलिसांनी नोंदवला नाही. टॅग्स :पोलिसPolice