Brazilian mom reportedly kills daughter gouges her eyes and tongue news
भयंकर! ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 01:27 PM2021-01-28T13:27:03+5:302021-01-28T13:46:42+5:30Join usJoin usNext जगभरातून गुन्हेगारी विश्वातील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समोर येत असतात. काही घटना इतक्या विचित्र असतात की त्यांच्यावर विश्वास ठेवण कठीण असतं. अशीच एक धक्कादायक घटना ब्राझिलमधून समोर आली आहे. याठिकाणची रहिवासी असलेल्या एका महिलेनं आपल्या मुलीचे डोळे आणि जीभ काढून जीव घेतला आहे. न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार आपल्या पाच वर्षीय मुलीला ठार मारण्याचे आरोप या महिलेवर लावण्यात आले आहेत. इतकंच नाही तर तिनं स्वतःच्या मुलीची जीभसुद्धा कापली आहे. पोलिसांनी केली अटक: Josimare Gomes da Silva या महिलेचे वय ३० वर्ष आहे. रविवारी या महिलेच्या राहत्या घरून पोलिसांनी अटक केली आहे. या मुलीच्या आजोबांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर या महिलेला अटक करण्यात आली आहे. मृत चिमुरडीच्या आजोबांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या महिलेनं स्वतःसह मुलीलाही बाथरूमध्ये बंद करून ठेवलं होतं. बाथरूमच्या खालच्या भागातून रक्त बाहेर यायला लागलं तेव्हा मी खूप घाबरलो. नंतर दिसलं की, आई आणि मुलगी सोबत होत्या आणि आई प्रार्थना करत होती. आरोपी महिलेनंही दिली कबुली: या महिलेनं पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात म्हटलं आहे की, ''आधी माझी मुलगी जीवंत होती. त्यांतर मी तिच्या तोंडावर कैचीनं वार करायला सुरूवात केली.'' आपल्या मुलीची जीभ कापणं आणि डोळ्यांमध्ये छिद्र करण्याचे कृत्य केलं नसल्याचे ती म्हणाली आहे मानसिक समस्यांचा सामना करावा लागत होता: माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेला अनेक दिवसांपासून मानसिक ताण तणावांच्या प्रसंगांचा सामना करावा लागला होता. डिप्रेशनमुळे या महिलेनं असं अमानवी कृत्य केलं असावं असा अंदाज लावला जात आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. (Image Credit- NY post, asianetnews)टॅग्स :गुन्हेगारीब्राझीलजरा हटकेCrime NewsBrazilJara hatke