प्रेयसीला सोबत घेऊन कॅशियरनेच लावला बँकेला चूना; 'इतकं' किलो सोनं लंपास By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:04 PM 2020-06-20T16:04:00+5:30 2020-06-20T16:10:53+5:30
मध्य प्रदेशातील श्योपुरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेकडून सोन्याच्या कर्जाच्या लॉकरमधून १५ किलो सोन्याच्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. चोरीच्या या प्रकरणात पोलिसांनी बँकेच्या कॅशिअरला अटक केली आहे आणि त्याला या संपूर्ण घटनेचा मुख्य सूत्रधार म्हणूनही अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर हा संपूर्ण परिसर चर्चेचा विषय झाला आहे.
श्योपुरच्या एसबीआय शाखेच्या मॅनेजरने १० जून रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, सोन्याच्या दागिन्यांच्या १०१ पाकिटे सोन्याच्या कर्जाच्या लॉकरमधून गायब आहेत. बँकेत चोरीच्या तक्रारीबद्दल पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.
चौकशीअंतीच पोलिसांना बँकेच्या कॅशिअरबाबत संशयास्पद वाटले. यानंतर जेव्हा याचा अधिक बारकाईने तपास केला असता असे आढळले की, राजीव या बँकेच्या कॅशिअर व इतर दोन साथीदारांनी ही चोरीची घटना घडवून आणली आहे.
पोलिसांनि छोट्या - छोट्या पुराव्यांच्या आधारे प्रथम कॅशियरला अटक केली आणि नंतर त्याचा मित्र नवीन आणि त्याची महिला मित्र ज्योती याच्याकडे पोलीस पोहोचले. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. कॅशियरचा साथीदार नवीन याने बनावट मार्गाने २६ वेळा चोरी केलेले सोने देऊन कर्जाच्या नावाखाली पैसे घेतल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.
या चोरीप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी ३ किलो सोन्याचे आणि ११ लाख रुपये जप्त केले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण चोरी आणि सोन्याच्या कर्जाच्या फसवणूकीशी संबंधित आहे, म्हणून सविस्तर तपास सुरू आहे. (All Photo - Aaj Tak)crime