Crime News: म्हणून त्याने पत्नी-मुलांसह संपूर्ण कुटुंबच संपवलं, आधी सर्वांना खीर भरवली आणि नंतर डोक्यात कुदळ घालून घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 10:34 AM2021-12-21T10:34:45+5:302021-12-21T10:47:51+5:30

Hisar Murder And Suicide Case : हरियामाणधील हिसारमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नी आणि तीन मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान आरोपी रमेश याच्या ११ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हरियामाणधील हिसारमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नी आणि तीन मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान आरोपी रमेश याच्या ११ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या सुसाइड नोटमध्ये रमेश याने त्याच्या जीवनाबाबतच्या अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. त्यामध्ये त्याच्या मनात काय सुरू होते. यामध्ये त्याची पत्नी त्याच्या सोबत होती की नाही, याची माहिती आरोपीने दिली आहे. या पत्रातील उल्लेखावरून रमेश हा त्याच्या जीवनाबाबत निराश होता. तो पत्नीकडे मरण्याबाबत उल्लेख करायचा. तसेच त्याची पत्नीही मरेपर्यंत त्याची सोबत करण्याचा विश्वास द्यायची, अशी माहिती समोर आली आहे.

या ११ पानांच्या सुसाईड नोटमध्ये रमेश लिहितो की, जयदेवजी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. तुम्हाला मी खूप दु:ख देतोय. पण पत्नी आणि मुलांना या जगात एकटे सोडू शकत नाही. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जात आहे. सर्वांची माफी मागतो. मला जेवढं वाईट समजायचे त्यापेक्षा वाईट होऊन जात आहे. मी केवळ तुमचा अपराधी आहे बाकी जगाचा नाही. काळजी घ्या, वेळेबरोबर सारे काही सुरळीत होईल. संदीपचीही माफी मागतो, गेल्यावर्षीच मी सांगितलं होतं हे सर्व काही होणार आहे. मी केवळ तुमचा आभारी आहे. तुमचा रमेश, मला मोक्ष, शांती हवी होती.

या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानावर मृत रमेश याने लिहिले की, हे पत्र जो कुणी वाचत आहे त्याने मला गुन्हेराग समजू नये. आज माझी लेखणी काहीशी वेगळी वाटतेय. सर्व काही करायला दोन तास लागलेत. सर्वांना झोपेच्या गोळअया दिल्यात. जे काही घडलंय ते अचानक घडलेलं नाही. मला ना कसली भीती ना माझ्यावर कसलं कर्ज आहे. महिना ५० हजार रुपये कमाई करतो. जीवतानीत बरीच स्वप्ने पूर्ण केली आहेत.

रमेश पुढे लिहितो की, मी लहानपणापासून सर्वांपासून वेगळा होतो. संसारिक सुखांऐवजी जगाकडे वेगळ्या नजरेने पाहायचो. कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान वाचल्यानंतर जगापासून वेगळा झालो. सर्व गोष्टी नकली वाटू लागल्या. कुठल्याही वस्तूमध्ये आनंद वाटणे बंद झाले. मेंदूतील एक भाग कौटुंबिक गोष्टी आणि लोकामध्ये होता. त्याचदरम्यान वडील गेले. तिथूनच माझी बरबादी सुरू झाली.

रमेश पुढे लिहितो की, मी लहानपणापासून सर्वांपासून वेगळा होतो. संसारिक सुखांऐवजी जगाकडे वेगळ्या नजरेने पाहायचो. कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान वाचल्यानंतर जगापासून वेगळा झालो. सर्व गोष्टी नकली वाटू लागल्या. कुठल्याही वस्तूमध्ये आनंद वाटणे बंद झाले. मेंदूतील एक भाग कौटुंबिक गोष्टी आणि लोकामध्ये होता. त्याचदरम्यान वडील गेले. तिथूनच माझी बरबादी सुरू झाली.

इच्छा नसतानाही आई आणि भावाची काळजी म्हणून लग्न झाले. मात्र त्यामुळे माझे आयुष्य अधिकच बिघडले. माझे मन १५ वर्षांपासून संन्यासी होते. मला मोक्ष मुक्ती हवी होती. मात्र संसारामधून बाहेर पडू शकलो नाही. वेगळं घर बांधून राहू लागलो, मात्र जीवनात काहीच चांगलं राहिलं नाही.

इच्छा नसतानाही मी पैसे कमावणारी मशीन बनलो होतो. खूप काम खूप पैसे कमावले. मात्र संन्यासी मन म्हणायचं की, आता पुरे कर. जीवनात बाकी काही इच्छा राहिली नव्हती. संन्यास घेण्याचा विचार १०-१५ वर्षांपासून सुरू होता. मात्र दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताने लवकर मजबूत केले. शरीर कमकुवत झाले होते. गळ्यामध्ये, श्वास घेण्यात, झोपण्यामध्ये खूप अडचणी यायच्या. शरीर खूप कमकुवत झालं होतं.

गेल्या वर्षी सर्वांकडे संन्यास देण्याची मुक्ती देण्याची विनंती केली. मात्र सर्वांनी गृहस्थ जीवनाचे महत्त्व सांगून मला रोखले. मी पत्नीसमोर नेहमीच रडायचो. मला जाऊ दे म्हणून विनंती करायचो. मात्र ती मरा रोखायची. मी एकटा मरू शकत नव्हतो. अखेर माझ्या पत्नीने जीवंत अथवा मृत एकत्र राहण्याचे वचन दिले. त्यामुळे या सर्वांना सोबत घेऊन जात आहे. आता माझ्या मागे रडणारा कुणीही नाही आहे. कुटुंबीय, भाऊ, बहिणींनी आधीच साथ सोडली आहे. अखेरच्या क्षणी मी सर्वांना माफ केलंय. पूर्णपणे संन्यासी होऊन मी जात आहे.

या कृतीसाठी कुणी मला डरपोक किंवा गुन्हेगार म्हणू नये. माझी जी काही संपत्ती होती ती मी पत्नी आणि मुलांसह घेऊन जात आहे. बाकी सर्व नश्वर गोष्टी इथेच आहे. धनामुळे मन खूश होत नाही. पैसा तर निवडणुकीवेळी खूप कमवायचो. मात्र मन तर फकीर झालं आहे. पत्नी आणि मुलांची माफी मागितली आहे.

माझी पहिली इच्छा तर मी सर्वांना सोबत नेऊन पूर्ण केलीय. आता रुग्णालयातून आम्हाला थेट स्मशानात घेऊन जा. कुटुंबात कुणीही नाही. माझ्या अस्थी हरिद्वारला नेण्याऐवजी स्मशानातील झाडांना घाला. मला संन्याशासारखा निरोप द्या.

याआधी तीन वेळा विजेच्या तारा तोंडात घेतल्या. मात्र करंट लागला नाही. आता समजलं मला करंट लागायचाच नाही. रात्रीचे चार वाजलेत, मी घराबाहेर पडलोय. एवढ्या थंडीमध्ये तुम्हा सर्वांना त्रास देऊन जातोय त्याबद्दल माफ करा.