Cyber Fraud In Noida Women Loses Rs 21000 After Orederd A Rs 178 Burger
बापरे! ऑनलाइन मागवला १७८ रुपयांचा बर्गर अन् खात्यातून चक्क २१ हजार गायब झाले By प्रविण मरगळे | Published: October 30, 2020 02:57 PM2020-10-30T14:57:40+5:302020-10-30T15:00:37+5:30Join usJoin usNext आपण देखील Google वरून कस्टमर केअरला नंबर फिरवून त्यानंतर कोणतेही APP आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करता का? असाल तर वेळीच सावधानता बाळगा अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज आम्ही तुम्हाला जी बातमी सांगणार आहोत ती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, कदाचित यामुळे आपली फसवणूक होण्यापासून वाचू शकते. सध्या ऑनलाइन व्यवहारांसोबत सायबर क्राईमही वाढत असल्याचं दिसून येतं. सायबरच्या माध्यमातून लोकांना लुबाडलं जातं. नोएडा येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका महिला सॉफ्टवेअर इंजिनीअरला ऑनलाइन बर्गर मागवणे इतके महागात पडले की, तिच्या खात्यातून तब्बल २१ हजार ८६५ रुपये गायब झाले तर बर्गरची किंमत फक्त १७८ रुपये इतकी होती. हे संपूर्ण प्रकरण रिमोट कंट्रोल अॅपशी संबंधित आहे. नोएडा सेक्टर -४५ मधील एका महिलेने १७८ रुपयांच्या प्री-पेड पेमेंटनंतर बर्गरची ऑर्डर दिली. बर्गरची डिलिव्हरी ३५ मिनिटांत होणार होती परंतु दीड ते दोन तास ही डिलिव्हरी झाली नाही यानंतर संबंधित महिलेने संबंधित रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याशी बोलल्यानंतर ऑर्डर रद्द केल्याचं तिथून सांगण्यात आलं. यानंतर महिला अभियंत्याने तिचे पैसे रिफंड मिळण्यासाठी गुगलवर संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर शोध घेतला आणि फोन केला. महिलेने संबंधित क्रमांकावर फोन केला तेव्हा पलीकडून कंपनीचा कर्मचारी बोलत असल्याचं सांगण्यात आलं, त्यानंतर आरोपीने महिलेला सांगितले की, तो कॉल मॅनेजर कडे ट्रान्स्फर करत आहे त्यानंतर पैसे परत येतील असं सांगण्यात आलं, यानंतर आरोपींने महिलेला मोबाईलमध्ये अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. महिलेने अॅप डाऊनलोड केले असता आरोपीने महिलेचा मोबाइल आपल्या ताब्यात घेतला. अॅप रिमोट कंट्रोल होते. यानंतर त्याने महिलेच्या खात्यातून २१ हजार ८६५ रुपये काढले. पैसे चोरल्यानंतर आरोपींनी महिलेला शिवीगाळ केली या आरोपीने महिलेला धमकावले की, जर तिने तक्रार केल्यास तिच्या खात्यातून अधिक पैसे काढले जातील. पीडित महिलेने याबाबत सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातविरोधात गुन्हा दाखल केला आहे अशा घटना टाळण्याचा मार्ग म्हणजे Google कडून कस्टमर केअरचा नंबर घेऊ नये त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही, संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून नंबर घ्या. या व्यतिरिक्त कोणाच्या सांगण्यानुसार आपल्या फोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अॅप डाऊनलोड करू नका पोलिसांच्या रेकॉर्डनुसार नोएडामध्ये दरमहा १०० पेक्षा जास्त सायबर फसवणूकीच्या घटना घडत आहेत. यातील फक्त पाच टक्के माहिती उघडकीस आली आहे.Read in Englishटॅग्स :सायबर क्राइमधोकेबाजीऑनलाइनcyber crimefraudonline