मोबाईल खरेदी करण्यासाठी पैसे दिले नाही, मुलानेच आईची केली गळा दाबून हत्या 

By पूनम अपराज | Updated: January 20, 2021 21:25 IST2021-01-20T21:10:34+5:302021-01-20T21:25:06+5:30

Murdre : उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सरधना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलाने मोबाईल खरेदी करण्यासाठी १० हजार न दिल्याने सावत्र आईला ठार मारले आहे. 

मुलाने सावत्र आईचा गळा दाबून तिची हत्या केली आहे. या घटनेनंतर आरोपी मुलगा स्वतः पोलिसांसमोर सरेंडर झाला.  (Photos - Aaj Tak)

आरोपीच्या वडिलांनी मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

इस्लामाबाद परिसरात राहणारा इबादुर्रहमान हा याच परिसरात क्लिनिक चालवतो. 

काही वर्षांपूर्वी  इबादुर्रहमान याने रेशमा (३५) नावाच्या महिलेशी दुसरा निकाह केला होता

इबादुर्रहमान याचा १९ वर्षाचा खिजर हा मुलगा नशेच्या आहारी गेल्याचं बोललं जात आहे.

पोलिसांचं म्हणणं आहे की, मंगळवारी दुपारी खिजर आपल्या घरी परतला. तेव्हा घरी त्याची सावत्र आई रेशमा घरी एकटी होती. मुलाने मोबाईल खरेदी करण्यासाठी १० हजार रुपये मागितले आणि सावत्र आईकडे जिद्द करू लागला. त्यावर रेशमाने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांत शाब्दिक चकमक सुरु झाली आणि मुलाला सावत्र आईने कानाखाली लगावली. त्यामुळे संतापलेल्या खिजरने सावत्र आईची गळा दाबून हत्या केली. 

त्यानंतर खिजरने आपल्या वडिलांना रेशमाची हत्या केल्याचं सांगितलं. तेव्हा वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी खिजरला बेड्या ठोकल्या