Mumbai Rave Party: आर्यन खानला जामीन मिळवून देण्यात सतीश मानेशिंदे अपयशी, शाहरुखनं आता वकीलच बदलला! By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 04:13 PM 2021-10-12T16:13:31+5:30 2021-10-12T16:27:18+5:30
Mumbai Rave Party On Cruise: अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज पार्टी प्रकरणात तुरुंगात आहे. त्याला अजूनही जामीन न मिळाल्यानं शाहरुख खान चिंताग्रस्त आहे. त्यामुळेच वकील बदलण्याचा निर्णय त्यानं घेतला आहे. आता कोण लढणार आर्यन खानचा खटला जाणून घ्या... आर्यन खान याला कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि तो सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन खान याच्या जामीन अर्जावर गेल्या आठवड्यात शुक्रवारी सुनावणी झाली होती. पण त्याला जमानत मिळू शकली नाही.
आर्यन खानचा खटला सुप्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे लढत होते. पण आता शाहरुख खान यानं वकील बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्यन खानच्या जामीन अर्जावर सेशन कोर्टात बुधवारी सुनावणी होणार आहे. यात आर्यन खान याचा खटला आता सतीश मानेशिंदे यांच्याऐवजी वकील अमित देसाई लढणार आहेत.
कोण आहेत अमित देसाई? अमित देसाई हे गुन्हे प्रकरणांमधील निष्णात वकील आहेत. त्यांनी आजवर अनेक गुन्हेगारी क्षेत्रातील प्रकरणं हाताळली आहेत. अभिनेता सलमान खान याला 2002 साली 'हिट अँड रन' प्रकरणी अनित देसाई यांनीच जामीन मिळवून दिला होता.
आर्यन खान याच्या जामीनासाठीचा अर्ज सोमवारी कोर्टात दाखल करण्यात आला आहे. यात अमित देसाई हे आर्यन खानची बाजू मांडणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अमित देसाई नुकतेच या प्रकरणात कोर्टासमोर आर्यनकडे कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज जप्त झालेलं नाही या मुद्द्यावर जोर देऊन व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मुद्दा लक्षात घेता जामीन अर्जावर लवकरात लवकर सुनावणी होणं गरजेचं आहे, असं म्हटलं आहे.
८ ऑक्टोबर रोजी कोर्टानं आर्यन खान याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जामीन अर्जावर सुनावणी केली जाऊ शकत नाही. कारण आर्यन खान ज्याप्रकरणात दोषी आढळला आहे त्यात जास्तीत जास्त ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, असं एनसीबीनं कोर्टात नमूद केलं होतं.
जामीन अर्जावर केवळ एनडीपीएस कोर्टातच सुनावणी केली जाऊ शकते. एनसीबीनं आर्यन खान याला मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर आयोजित ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केली आहे.
आर्यन खान याला क्रूझवरून ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याची कसून चौकशी केली गेली होती. त्यानंतर आर्यनला अटक करण्यात आली. आर्यन सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे.