असा झाला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, लक्झरी रूममध्ये परदेशी मुली; सोशल मीडियावरून ग्राहक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 07:03 PM2021-06-02T19:03:56+5:302021-06-02T19:34:51+5:30

Exposing sex racket - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पोलिसांनी हाय प्रोफाइल प्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे. विशेष म्हणजे पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी हे रॅकेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवले जात होते.

गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. लखनऊ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या सेक्स रॅकेटचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी केली जात होती.

लखनऊ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या सेक्स रॅकेटचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी केली जात होती. यानंतर व्हॉट्सऍपच्या माध्यमातून परदेशी मुलींना ग्राहकांशी संपर्क साधून लक्झरी रूममध्ये पुरवले जात होते.

ग्राहकांची ओळख कोणत्याही प्रकारे उघडकीस येऊ नये म्हणून हॉटेलमध्ये त्यांचे नाव व ओळख लपवण्यात आली होती.

चिनहटच्या विकल्पखंडमध्ये सेक्स रॅकेट चालवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी येथील लक्झरी इन हॉटेलमध्ये छापा टाकून दहा जणांना परदेशी मुलींसह अटक केली.

गोमती नगरचे डीसीपी संजीव सुमन यांनी राजा नावाची व्यक्ती देशी-परदेशी महिलांबरोबर सेक्स रॅकेट चालवित असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, पोलिस पथकाने दोन उझबेकिस्तान, चार दिल्लीच्या मुलींना अटक केली आहे.

हॉटेलच्या मालक आणि व्यवस्थापकालाही पोलिस पथकाने अटक केली आहे.

पोलिसांच्या या कारवाई दरम्यान लोक हॉटेलच्या अनेक खोल्यांमध्ये थांबले होते. इथल्या पोलिसांना पाहून घाबरुन गेले. झटापटीत चार तरुण घटनास्थळावरून पळून गेले.

पोलिसांनी हॉटेलमधून रजिस्टर व इतर अनेक कागदपत्रे हस्तगत केली आहेत.

फरार आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करत आहेत.