गर्लफ्रेंडसाठी केली 8 लाखांची चोरी, पोलिसांनाही इमोशनल करून गेली 'या' दोघांची 'लव्ह स्टोरी' By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 04:05 PM 2020-05-29T16:05:19+5:30 2020-05-29T16:15:07+5:30
तेलंगाणाची राजधानी हैदराबादमध्ये एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसाठी तब्बल 8 लाख 51 हजार रुपयांची चोरी केली. विशेष म्हणजे, या तरूनाने है पैसे आपल्याच कंपनीतून काढले. यानंतर, त्याने असा काही प्लॅन बनवला, की खुद्द पोलीसही विचारात पडले.
पीटीआय, या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण हैदराबादमधील आहे. घटनेतील आरोपी MBA असून येथील एका पेपर मिलमध्ये काम करतो.
आरोपी तरुणाने 25 मेरोजी आपल्या कंपनीच्या वेगवेगळ्या एजन्ट्सशी संपर्क साधला. यानंतर त्यांने आपल्या सर्वच एजन्ट्सकडून तब्बल 8.51 लाख रुपये जमवले आणि हे पैसे घेऊन तो फरार झाला.
यानंतर आरोपीनेच पोलिसात तक्रार दाखल केली, की काही लोकांनी त्याला लुटले आणि त्याच्याकडील सर्व पैसे हिसकावून घेतले. आरोपीच्या तक्रारीनंतर घटनेचा तपास सुरू झाला. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.
पोलिसांनी सांगितले, की तपास सुरू झाल्यानंतर हळू-हळू संबंधित तरुणावर संशय वाढू लागला. यानंतर त्याने स्वतःच गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सर्व पैसे जप्त केले असून त्याला अटक केली आहे.
यावेळी पोलिसांनी सांगितले, की आरोपीची गर्लफ्रेंड अत्यंत आजारी आहे. तिच्यावर उपचार करण्यासाठी संबंधित तरुणाजवळ पैसे नाहीत. यामुळे संबंधित तरुणाने हा बनावट लुटीचा प्लॅन तयार केला होता.