दुष्कर्म! मृताच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकलं लाटणं, अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 06:46 PM 2022-03-21T18:46:01+5:30 2022-03-21T19:11:05+5:30
Sexual Abuse Case : बहादूरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात, दोन मित्रांनी एका तरुणाशी दारूच्या नशेत दुष्कर्म केल्याने अतिरक्तस्रावामुळे तरुणाचा मेरठच्या रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह बहादूरगड पोलीस ठाण्यात आणून एकच खळबळ उडवून दिली. पोलिसांच्या आश्वासनाने कुटुंबीय शांत झाले. मृताच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली.
बहादूरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवाशाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्याने सांगितले की, तो आपल्या कुटुंबासह नोएडा येथे राहतो. ज्याचा लहान भाऊ गावात एकटाच राहतो.
रात्री आठच्या सुमारास घरातून भावाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे काही लोक घटनास्थळी पोहोचले. जिथे त्याचा भाऊ रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना व त्याला दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून भावाची चौकशी केली असता, त्याने सांगितले की, दारूच्या नशेत दोन मित्रांनी त्याच्याशी गैरवर्तन केले, त्यांनी जबरदस्तीने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाकडी लाटणं टाकलं. आरडाओरडा करून शेजारी येत असल्याचे पाहून दोन्ही आरोपी पळून गेले.
पोलिसांनी त्याच्या भावाला स्थानिक रुग्णालयात दाखल केले, तेथून डॉक्टरांनी त्याला मेरठला रेफर केले. तेथे उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला.
तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली असून शनिवारी रात्री कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मृतदेह घेऊन बहादूरगड पोलीस ठाणे गाठले. ज्यांनी मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवून गोंधळ घातला आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.
सीओ पवन कुमार यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे टिंकू उर्फ रुपेश आणि राहुल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्येचा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.