OMG! तो परत आला, हुकुमशहा गद्दाफीचा फाशीची शिक्षा झालेला मुलगा रहस्यमयरित्या प्रकटला By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 07:52 PM 2021-08-01T19:52:46+5:30 2021-08-01T20:03:59+5:30
Gaddafi's son Saif al-Islam Gaddafi came out: कर्नल गद्दाफीच्या या मुलाचे नाव सैफ अल-इस्लाम गद्दाफी (Saif al-Islam Gaddafi) आहे. 49 वर्षीय सैफ अल-इस्लाम ला 2011 मध्ये गद्दाफीला मारल्यानंतर पकडण्यात आले होते. तेव्हा त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामुळे लिबियाच नाही तर जगभरातील लोक त्याला मृत समजत होते. कर्नल मुअम्मर अल गद्दाफी (Colonel Gaddafi) हा लिबियाचा (Libya) हुकुमशहा होता. त्याला बंडखोरांनी ठेचून मारल्यानंतर त्याचा मुलगा रहस्यमयरित्या जगासमोर आला आहे. गृहयुद्धाने पेटलेल्या लिबीयावर पुन्हा त्याला राज्य करायचे आहे. लिबियामध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढण्याची शक्यताही त्याने वर्तविली आहे. (Gaddafi's son Saif al-Islam Gaddafi who was believed dead after being sentenced to death returned.)
कर्नल गद्दाफीच्या या मुलाचे नाव सैफ अल-इस्लाम गद्दाफी (Saif al-Islam Gaddafi) आहे. 49 वर्षीय सैफ अल-इस्लाम ला 2011 मध्ये गद्दाफीला मारल्यानंतर पकडण्यात आले होते. तेव्हा त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामुळे लिबियाच नाही तर जगभरातील लोक त्याला मृत समजत होते.
सैफ अल-इस्लामला गद्दाफीचा वारसदार समजले जात होते. यामुळे पुढे तो जिवंत राहिला तर पुन्हा लिबियाचा ताबा घेईल असे वाटत होते. यामुळे त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती.
2011 मध्ये लिबियाची राजधानी त्रिपोलीवर विद्रोहींनी नियंत्रण मिळविले होते. यानंतर हुकुमशहा जनरल गद्दाफीला पकडून त्याला मारून मारून ठार करण्यात आले होते.
गद्दाफीला मारल्यानंतर त्याच्या या मुलाला देखील मृत्यूची शिक्षा देण्यात आली होती. कारण तो गद्दाफीचा उत्तराधिकारी होता. आता जवळपास 10 वर्षांनी तो प्रकटल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सैफ अल-इस्लामला फाशी देण्यात आली होती, की त्याच्या माणसांनी बनाव रचला होता. या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.
Muammar Gaddafi of Libiya: गद्दाफीच्या या मुलाने अमेरिकेचे वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सला एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने लिबियाला एकत्र आणायचे म्हटले आहे. गद्दाफी यांच्या मृत्यूनंतर लिबिया गृहयुद्धात फुटला आहे. मी गेल्या 10 वर्षांपासून लिबियाच्या लोकांपासून दूर होतो. आता पुन्हा परतण्याची वेळ आली आहे.
जून 2014 नंतर सैफ अल-इस्लामला कुठेही पाहण्यात आले नव्हते, नाही त्याचे कठे नाव आले होते. सैफने सांगितले की, आता तो राजकारणात परतण्याची तयारी करत आहे. मला पकडणारे लोक आता माझे मित्र बनले आहेत.
किती जरी असले तरी देखील सैफला लिबियाच्या राजकारणात येण्यासाठी संकटांचा सामना करावा लागणार आहे. सैफ हा ब्रिटनमध्ये शिकलेला आहे. तो यामध्ये यशस्वी होण्याचा दावा करत आहे.
सैफ अल-इस्लामला 2016 मध्ये सोडून देण्यात आले होते असे सांगितले जात आहे. मात्र, तो सार्वजनिकरित्या कुठेही दिसला नव्हता. यामुळे तो मारला गेला असेल असे समजले जात होते. (Saif al-Islam Gaddafi, the son of Lybian dictator Muammar Gaddafi, has come out of hiding after vanishing six years ago)