Girlfriends, gangsters and encounters; Gangstar Sandeep Gadoli Case viral after vikas dubey
गर्लफ्रेंड, गँगस्टर आणि एन्काऊंटर; मुंबईत घडलेला ‘तो’ गुन्हा ४ वर्षानं पुन्हा चर्चेत, कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 01:01 PM2020-07-13T13:01:41+5:302020-07-13T13:10:52+5:30Join usJoin usNext ८ पोलिसांच्या हत्येनंतर विकास दुबेचा पोलिसांनी खात्मा केला पण या यानंतर अन्य राज्यात पोलिसांकडून करण्यात आलेल्या एन्काऊंटरबाबत सोशल मीडियात चर्चेला उधाण आलं आहे. हरियाणातील कुप्रसिद्ध गँगस्टर संदीप गाडौलीचा मुंबईत हॉटेलमध्ये ४ वर्षापूर्वी एन्काऊंटर झाला होता. फेब्रुवारी २०१६ मध्ये मुंबईत झालेल्या तथाकथित एन्काऊंटरमुळे त्याची गर्लफ्रेंड दिव्यासह गुरुग्राम पोलिसातील काही जवान जेलमध्ये बंद आहेत. या आरोपींवर हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. संदीप गाडौलीच्या एन्काऊंटरवेळी २० वर्षाची गर्लफ्रेंड दिव्या त्याच्यासोबतच होती. एन्काऊंटरनंतर ती गायब झाली. संदीप गाडौलीचा पाठलाग करत गुरुग्राम पोलीस ७ फेब्रुवारी २०१६ ला मुंबईतील हॉटेलमध्ये पोहचली. पोलीस हॉटेलमध्ये संदीपच्या रुममध्ये पोहचताच त्याठिकाणी संदीप आणि त्याची गर्लफ्रेंड दिव्या उपस्थित होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार जेव्हा संदीपला आत्मसमर्पण करण्यास सांगितले तेव्हा त्याने नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये त्याचा खात्मा केला. गँगस्टरची गर्लफ्रेंड दिव्या हिच्यावर पोलिसांच्या कटात सहभागी होण्याच्या आरोपाखाली तुरूंगात आहे. चकमकीनंतर मुंबई पोलिसांच्या तपासणीत ती अडकली. गुरूग्राम क्राइम ब्रँचने मुंबईत पोलिसांच्या पथकाकडुन केलेल्या हत्येचा प्रयत्न गुन्हा शाखेकडे गुन्हा दाखल केला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी संदीप गाडौलीची गर्लफ्रेंड दिव्या आणि तिच्या आईला अटक केली. दिव्यावर आरोप आहे की जेव्हा गुरुग्राम पोलिसांनी संदीप गडोलीची हत्या केली तेव्हा त्याची मॉडेल गर्लफ्रेंड दिव्या त्याच्यासोबत होती. संदीप गडोलीच्या कुटुंबीयांनी गुरुग्राम पोलिसांवर आरोप केला आहे की, मुलगा संदीपला त्याच्या गर्लफ्रेंडने जाणूनबुजून शस्त्राविना मुंबईत बोलावले होते. गुरुग्राम पोलिसांनी दिव्याचा हनीट्रॅप म्हणून वापर केला. दिव्याने तिच्या सौदर्यांने गँगस्टर संदीपला घायाळ केले. हळू हळू ती संदीपच्या जवळ गेली. वास्तविक, गुरूग्राम पोलिसांवर हा आरोप मुंबई पोलिसांकडून तपासणीनंतर लावण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची गर्लफ्रेंड दिव्याला संदीप गडोलीचा एन्काऊंटर करण्यासाठी हनिट्रेप म्हणून वापरण्यात आले. दिव्या मुंबईत आयटी कंपनीत काम करायची, पण हळूहळू ती मॉडेलिंगमध्ये गेली होती त्याचवेळी, दिव्याचे वडील अशोक यांनी आरोप केला आहे की, आपल्या मुलीच्या मित्रांनी संदीप गडोलीचे खरे नावदेखील लपविले होते, संदीप गाडौलीशी मुलीची ओळख रिषव म्हणून झाली. ४ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता मनीष खुराना व दीपू असे दोन लोक माझ्या घरी आले. दिव्याने सांगितले ते एका कामानिमित्त जयपूरला जात आहेत. आम्ही तिला थांबवले पण तिने ऐकले नाही. तपासादरम्यान मुंबई पोलिसांनी ६ जुलै २०१६ रोजी एसआय प्रद्युम्न यादव यांना अटक केली. त्यानंतर विक्रम, दीपक, जितेंद्र आणि परमजीत यांनाही अटक करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयातून दीपक आणि जितेंद्र या दोन पोलिस कर्मचार्यांना जामीन मिळाल्यानंतर ते हरियाणा पोलिसांच्या ड्युटीमध्ये दाखल झालेत त्याचवेळी उर्वरित तीन पोलिसांना जामीन मिळणे बाकी आहे.टॅग्स :मुंबई पोलीसMumbai police