Gujtath Boy revenge his brother fight killed 12 year old boy in surat
धक्कादायक!: भावाच्या भांडणाचा बदला; 13 वर्षांच्या मुलानं केली 12 वर्षांच्या मुलाची हत्या! By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 30, 2021 02:06 PM2021-01-30T14:06:46+5:302021-01-30T14:15:13+5:30Join usJoin usNext गुजरातमधील सुरत जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भावाच्या भांडनाचा बदला म्हणून, एका 13 वर्षांच्या मुलाने एका 12 वर्षांच्या मुलाची हत्या केली. या 13 वर्षांच्या मुलाला आपल्या छोट्या भावासोबत एका दुसऱ्या मुलाने भांडण केल्याचा एवढा राग आला, की त्याने दांड्याने मारून त्याची हत्या केली. संबंधित मुलाचा मृतदेह सूरतमधील पांडेसरा भागातील भेस्तानच्या झुडपात आढळून आला. यामुळे जवळ-पासच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मुलाच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक दांडाही सापडला आहे. हत्या झालेल्या मुलाचे वय साधारणपणे 12 वर्ष असावे. असे असताना या मुलाचा शत्रू कोण असू शकतो? या विचाराने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यानंतर धक्कादायक प्रकार त्यांच्यासमोर आला. संबंधित मृतक मुलाचे आरोपी मुलाच्या 8 वर्षीय भावासोबत भांगडण झाले होते. येथे शिवीगाळही झाली होती, असे समजते. आरोपी मुलाने याच भांडणाचा बदला घेण्यासाठी डोक्यात दांडा मारून संबंधीत मुलाची हत्या केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. क्राइम न्यूज...टॅग्स :गुन्हेगारीगुजरातसूरतपोलिसपोलीस ठाणेCrime NewsGujaratSuratPolicePolice Station