Shocking! HIV पॉझिटिव्ह तरूणाने अनेक महिलांसोबत ठेवले संबंध, त्याच्या गर्लफ्रेन्डनेच केला खुलासा... By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 12:16 PM 2021-07-26T12:16:56+5:30 2021-07-26T12:27:10+5:30
अशात तीन महिलांना मान्य केलं की, त्या बर्न्ससोबत डेट करत होत्या आणि त्यांनी त्याच्यासोबत शरीरसंबंधही ठेवले. त्यानेही याबाबत त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या एका तरूणाला दोन वर्षांची तुरूंगावासाची शिक्षा झाली आहे. हा तरूण एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. तरी काही महिलांसोबत त्याने संबंध ठेवले आणि त्यांना तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं नाही. अशात त्याने दुसऱ्यांनाही एचआयव्ही संक्रमित केलं.
फ्लोरिडाचा राहणाऱ्या तरूणाने अनेक महिलांसोबत हे न सांगता संबंध ठेवले की, तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्याच गर्लफ्रेन्डने पहिल्यांदा याचा खुलासा केला.
२७ वर्षीय जेंट्री बर्न्स नावाच्या तरूणाच्या एक्स गर्लफ्रेन्डने पोलिसात तक्रार दिली होती की, २०१३ मध्ये डेट करताना ती एचआयव्ही संक्रमित झाली होती. याप्रकरणी वोलुसिया काउंटी शेरीफ ऑफिसने चौकशीनंतर आरोपपत्र दाखल करण्यास सांगितलं.
यानंतर पीडितेने इतर महिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, ज्या जेंट्री बर्न्सला डेट करत होत्या. जेणेकरून त्यांना सूचना देता यावी की, जेंट्री एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे.
यादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना मेडिकल रिपोर्टमध्ये आढळून आलं की, बर्न्स जानेवारी २०१४ मध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळला होता.
अशात तीन महिलांना मान्य केलं की, त्या बर्न्ससोबत डेट करत होत्या आणि त्यांनी त्याच्यासोबत शरीरसंबंधही ठेवले. त्यानेही याबाबत त्यांना काहीच सांगितलं नव्हतं.
असंही सांगण्यात आलं की, यादरम्यान कमीत कमी दोन महिला या आजाराने संक्रमित आढळून आल्या होत्या. २०१६ मध्ये बर्न्सला डेट केल्यावर २०१७ मध्ये एका महिलेला एचआयव्हीची लागण झाली होती.
पोलीस म्हणाले की, जेंट्री बर्न्सने आणखीही काही शहरात प्रवास केला होता. असाही अंदाज आहे की, दुसऱ्या ठिकाणच्या महिलांसोबतही त्याने शरीरसंबंध ठेवले असतील. याबाबत चौकशीच्या आधारावर तपास केला जाईल.
दरम्यान, अमेरिकेत जवळपास १.२ मिलियन लोकांना एचआयव्ही आहे. ज्यातील जवळपास १३ टक्के लोकांना हे माहितच नाही की, त्यांना हा आजार झाला आहे.
तेच फ्लोरिडाच्या कायद्यानुसार एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यावर शारीरिक संबंध ठेवणं कायदेशीर गुन्हा आहे. याचप्रकारचा कायदा अमेरिकेतील २१ इतर राज्यांमध्ये लागू आहे.