बॉयफ्रेन्डसोबत हॉटेलवर मजा मारायला गेली होती पत्नी, अचानक पती समोर आला आणि मग.... By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 10:34 AM 2021-04-06T10:34:37+5:30 2021-04-06T10:59:26+5:30
जेव्हा त्याला समजलं की, ती तिच्या प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेलीये तर तो तिला रंगेहाथ पकडण्यासाठी तिथे पोहोचला. पंजाबच्या अमृतसरमध्ये पती आणि पत्नी यांच्यात एका हॉटेलमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. इथे एका पतीने त्याच्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं.
जशी व्यक्तीची पत्नी तिच्या प्रियकरासोबत हॉटेलच्या रूममधून बाहेर आली तशी पतीने तिला दे दणा दण मारहाण सुरू केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
असे सांगितले गेले की, महिलेची पतीसोबत घटस्फोटाची केस सुरू होती. पण पतीकडून पैसे घेतल्यावरही महिलेने घटस्फोट देण्यास नकार दिला.
त्यानंतर महिलेच्या पतीला समजलं की, त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत एका हॉटेलमध्ये आहे. मग काय पती त्याच्या काही मित्रांसोबत हॉटेलमध्ये पोहोचला आणि पत्नीला बघताच तिला मारहाण करू लागला.
महिलेचा पती पोलीस कॉन्स्टेबल आहे आणि त्याची पत्नी गुरदासपूरची आहे. तर या महिलेचा प्रियकर एसजीपीसीचा कर्मचारी आहे.
पतीने त्याच्या पत्नीवर आरोप लावला की, गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या पत्नीचं एक तरूणासोबत अफेअर सुरू होतं आणि ती बऱ्याच दिवसांपासून त्याला दगा देत होती.
जेव्हा त्याला समजलं की, ती तिच्या प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेलीये तर तो तिला रंगेहाथ पकडण्यासाठी तिथे पोहोचला.
कॉन्स्टेबल पतीचा आरोप आहे की, त्याचं लग्न होऊन सहा वर्षे झाली आहेत. मात्र, पत्नी छोट्या छोट्या गोष्टींवरून त्याच्यासोबत भांडत असते.
अनेकदा पत्नी भांडण करून माहेरी निघून जाते. दोन्ही परिवारांमधील वाद पंचायतने मिटवला होता. दोघेही शांतीने जालंधरला राहतील असं ठरलं होतं.
पतीने सांगितले की, त्याची पत्नी नेहमीच मोबाइलवर बिझी राहते. त्याला पत्नीवर संशय होऊ लागला. त्यामुळे तिच्यावर बऱ्याच दिवसांपासून ते नजर ठेवून होता.
रंजीत एवेन्यू पोलीस स्टेशनचे प्रभारी रॉबिन हंस यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेची आणि तिच्या प्रियकराची चौकशी केली जात आहे.