तुम्हालाही आला आहे का हा मेसेज?, थांबा क्लिक करु नका; गृह मंत्रालयाकडून अलर्ट जारी By मोसीन कदीर शेख | Published: January 16, 2021 01:45 PM 2021-01-16T13:45:16+5:30 2021-01-16T13:49:25+5:30
मागील काही महिन्यांपासून बँकिंग फ्रॉड (Banking Fraud) प्रकरणांत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणूची महामारी सुरू झाल्यामुळे लागलेला लॉकडाऊन आणि इतर निर्बंधांमुळे आर्थिक फसवणुकीला आळा बसला असेल हा तुमचा समज वस्तुस्थिती समजताच धक्का देणारा आहे.
केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) वर्ष २०२० साठीच्या अहवालात म्हटले आहे की, २०१९ मध्ये बँकांच्या फसवणुकीचे ९१ प्रकार घडले होते ते पुढच्या वर्षी १९६ झाले. वर्ष २०२० मध्ये सीबीआयकडे फसवणुकीची ५४३ प्रकरणे आली त्यातील १९६ ही बँकांच्या फसवणुकीची होती. २०२० मध्ये बँक फसवणुकीची रक्कम होती.
लक्षणीय बाब म्हणजे गेल्या वर्षी बँक फसवणुकीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले. सीबीआयने बँक फसवणुकीचे ५० पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले. त्यातील जवळपास ३० मुंबईतील होती. पुणे, नागपूर आणि चेन्नईत १७, गुजरातच्या गांधीनगरमध्ये १६ गुन्हे दाखल झाले.
सर्वात मोठा निशाणा डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन ट्रान्झेक्शनकरणाऱ्यां लोकांना केलं जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँक अकाउंटबाबत सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. वाढते फसवणुकीचे प्रकार पाहता वेळोवेळी बँका, आरबीआय आणि सरकारकडूनही याबाबत लोकांना सतर्क केलं जात आहे.
सायबर आरोपी लोकांची फसवणूक करण्यासाठी, त्यांना लुटण्यासाठी अनेक प्रकारच्या पद्धती अवलंबत आहेत. आता या स्कॅमर्सनी फसवणूकीची एक नवी पद्धत सुरू केली आहे. याबाबत गृह मंत्रालयानेच माहिती दिली आहे.
सरकारने ट्विटर हँडल Cyber Dost वर ट्विट करून लोकांना फ्रॉड बाबतच्या नव्या पद्धतींबाबत सतर्क केलं आहे. सध्या फ्रॉस्टर्स लोकांना एसएमएस पाठवून त्यांचं बँक अकाउंट खाली करत आहेत.
लोकांनी कोणत्याही मेसेजवर येणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही लिंकबाबतचा मेसेज आल्यास, त्वरित त्यांची तक्रार सायबर क्राईम पोलिसात करावी, असं गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
लोकांनी कोणत्याही मेसेजवर येणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही लिंकबाबतचा मेसेज आल्यास, त्वरित त्यांची तक्रार सायबर क्राईम पोलिसात करावी, असं गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.