तुला पैसे मिळाले की, तू सर्व करशील!; आई मुलीला रोज द्यायची गर्भनिरोधक गोळ्या By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 02:48 PM 2022-06-09T14:48:28+5:30 2022-06-09T15:24:19+5:30
Prostitution Case : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये आई आणि मुलीच्या अत्यंत पवित्र नात्याला लाज वाटणारी घटना समोर आली आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी एका आईने आपल्या मुलीला लहानपणीच वेश्या व्यवसायात ढकलले. मुलीने विरोध केल्यावर तिला मुंबईतल्या तिच्या दोन सख्ख्या भावांकडे पाठवले, त्यांनी तिचा विरोध असूनही जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. मुंबईतल्या बारमध्ये तिला डान्सही करावा लागला. मुंबईतून पळून आलेल्या मुलीने सुभाषनगर पोलीस ठाण्यात आई, मावशी -काका आणि दोन्ही मामांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
मुलीच्या म्हणण्यानुसार, १६ मे रोजी जेव्हा ती मुंबईतील एका डान्सबारमधून परतली तेव्हा तिने तिच्या दोन्ही मामांसोबत अश्लील नृत्य आणि देहव्यापार करण्यास स्पष्टपणे नकार दिला. यानंतर आता तिचा सर्व संकोच दूर होईल असे सांगून तिच्या दोन्ही मामांनी एक एक करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर संधी मिळताच ती मुंबईतून पळून गेली. मंगळवारी बरेलीला आल्यानंतर तिने थेट एसएसपी कार्यालय गाठले आणि आपबिती सांगितली. (Photo - Amar Ujala)
मुलीच्या म्हणण्यानुसार, १६ मे रोजी जेव्हा ती मुंबईतील एका डान्सबारमधून परतली तेव्हा तिने तिच्या दोन्ही मामांसोबत अश्लील नृत्य आणि देहव्यापार करण्यास स्पष्टपणे नकार दिला. यानंतर आता तिचा सर्व संकोच दूर होईल असे सांगून तिच्या दोन्ही मामांनी एक एक करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर संधी मिळताच ती मुंबईतून पळून गेली. मंगळवारी बरेलीला आल्यानंतर तिने थेट एसएसपी कार्यालय गाठले आणि आपबिती सांगितली.
मुलीने दाखल केलेल्या अहवालात तिची स्वतःची आई आणि नातेवाईकांनी तिचे जीवन नरकापेक्षाही वाईट केल्याचे नमूद केले आहे. आता तिला ते सहन होत नव्हते. तिची आई, मावशी, काकू आणि मामा दुबईतील कोणाला तरी तिला विकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखी तिला केला. तिच्या घटनात्मक आणि मूलभूत अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे, असे तिने तक्रारीत लिहिले आहे.
पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिच्या दोन्ही मामांनी तिला तिथे बसवले. बारमध्ये लोक दारू पिण्यासाठी यायचे, त्यांना त्यांच्यासमोर अश्लील नृत्य करावे लागायचं. नकार दिल्यावर दोन्ही मामा बेदम मारहाण करायचे. बारमधून मिळालेले पैसेही हिसकावून घेतले. यातील काही रक्कम तिच्या आईच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती.
मुलीने सांगितले की, तिने तिच्या आईला अनेकवेळा फोन करून मुंबईत तिच्यावर होत असलेल्या अमानवी वागणुकीबद्दल सांगितले. तिच्या आईने तिचे काही ऐकले नाही, तिला सांगितले की, तुला पैसे मिळत आहेत, तू सर्वकाही करशील. मुलीने सांगितले की, तिच्या आईने असे अनेकवेळा सांगितले ज्याचे कॉल रेकॉर्डिंग तिच्याकडे सुरक्षित आहे.