लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवल्यास १० वर्षांची शिक्षा; १ जुलैपासून IPC ची जागा भारतीय न्याय संहिता घेणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 07:54 PM2024-06-19T19:54:44+5:302024-06-19T20:02:35+5:30

IPC vs BNS: गुन्हेगारी घटनांना पायाबंद घालण्यासाठी आधीचे कायदे तोकडे पडत होते. यामुळे आणखी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे कायदे १ जुलैपासून देशभरात लागू होतील अशी घोषणा केली आहे.

देशात तीन नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत. गुन्हेगारी घटनांना पायाबंद घालण्यासाठी आधीचे कायदे तोकडे पडत होते. यामुळे आणखी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे कायदे १ जुलैपासून देशभरात लागू होतील अशी घोषणा केली आहे.

लोकांना वेळेवर न्याय मिळत नव्हता. न्याय प्रणालीमध्ये समस्या होत्या. यामुळे हे कायदे बदलण्यात आल्याचे मेघवाल यांनी स्पष्ट केले आहे. यानुसार आयपीसीला भारतीय न्याय संहिता म्हणून ओळखले जाणार आहे. तर CRPC ला भारतीय नागरी संरक्षण संहिता म्हणून ओळखले जाईल. तर 872 चा भारतीय पुरावा कायदा भारतीय पुरावा संहिता म्हणून ओळखला जाणार आहे.

आता या कायद्यांची नावेच नाही तर कायद्यांमधील तरतूदींमध्येही बदल केले जाणार आहेत. कोणते कृत्य गुन्हा आहे आणि त्यासाठी कोणती शिक्षा होईल हे आयपीसीमध्ये ठरविण्यात आले होते. यपीसीमध्ये 511 कलमे होती. भारतीय न्यायिक संहितेत 356 कलमे असणार आहेत.

आयपीसीमध्ये कलम ३७५ मध्ये बलात्काराची व्याख्या आहे, तर कलम ३७६ मध्ये शिक्षेची तरतूद आहे. नव्या कायद्यात कलम 63 मध्ये बलात्काराची व्याख्या आणि कलम 64 ते 70 मध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. बलात्काराची शिक्षा १० वर्षेच ठेवण्यात आली आहे. परंतू अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना दुप्पट शिक्षा देण्यात आली आहे.

16 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची ते जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. यात जन्मठेप म्हणजे अख्खे आयुष्य तुरुंगातच काढावे लागणार आहे. 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्काराच्या आरोपीला २० वर्षे शिक्षा ते जन्मठेप, अति गंभीर गुन्हा असेल तर फाशीची शिक्षाही देण्यात येणार आहे. सामूहिक बलात्कार प्रकरण असेल तर BNS च्या कलम 70(2) अन्वये अल्पवयीन मुलगी पिडीता असल्यास जन्मठेपेची शिक्षा ते फाशी अशी तरतूद आहे.

भारतीय न्याय संहितेत नवीन कलम 69 आले आहे. यात लग्न, नोकरी किंवा बढतीच्या भुलथापा देऊन शरीर संबंध ठेवल्यास 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा व दंडाची तरतूद आहे. ओळख लपवून लग्न केल्यासही १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. हुंडाबळीच्या शिक्षेत कोणताही बदल केलेला नाही.