"तू एवढी लुकडी सुकडी, रायफल कशी झेपेल?"; रोड रोमिओने महिला पोलिसाचीच छेड काढली अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 12:56 PM 2021-02-25T12:56:24+5:30 2021-02-25T13:01:46+5:30
Crime news road Romeo: गुन्हेगारी एवढी सोकावली आहे की आता पोलिसांचाही कोणाला धाक राहिलेला नाही. एका रोडरोमियोने एका महिला पोलीस हवालदाराचीच छेड काढली, ती पण वर्दीमध्ये असताना. पण पुढे जे घडले ते पाहून पुन्हा हा रोड रोमियो महिलांकडे ढुंकूनही पाहणार नाही. उत्तर प्रदेशच्या महिलांसोबत छेडछाडीचे प्रकार दररोज वाढत चालले आहेत. गुन्हेगारी एवढी सोकावली आहे की आता पोलिसांचाही कोणाला धाक राहिलेला नाही. एका रोडरोमियोने एका महिला पोलीस हवालदाराचीच छेड काढली, ती पण वर्दीमध्ये असताना. पण पुढे जे घडले ते पाहून पुन्हा हा रोड रोमियो निदान महिला पोलिसांकडे ढुंकूनही पाहणार नाही.
बुधवारी बरेलीच्या फरीदपूर पोलीस ठाणे परिसरात एक महिला पोलीस शिपाई ड्युटीवर जात होती. तिला पाहून एका रोड रोमियोने छेड काढली.
महिला पोलिसाकडे पाहून तो म्हणाला, तू एवढी बारीक (पातळ) आहेस की रायफल कशी सांभाळत असशील? टिप्पणी नंतर सडपातळ दिसणाऱ्या महिला पोलिसाने त्याला चांगलाच इंगा दाखवला.
रोड रोमिओला त्या महिला पोलिसाने पकडले आणि चांगला चोप दिला. एवढ्यावरच ती थांबली नाही, तर तिने धुलाई केल्यानंतर पोलीस ठाण्यात फोन करून सगळ्या पोलिसांनाच तिथे बोलावले.
पोलीस फोर्स येतेय हे समजल्यावर तो रोड रोमियो महिला पोलिसाला धक्का देऊन पळाला. धक्काबुक्कीमध्ये त्याचा मोबाईल तिथेच पडला.
महिला पोलिसाने सांगितले की, तो तरुण या भागात येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींची छेड काढून त्यांच्याक अशाच कमेंट करत असतो. आज माझी छेड काढली तर त्याची चांगलीच धुलाई केली.
फरीदपुरच्या साहूकारा गल्लीमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींची छेड काढण्यात येत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती.
यामुळे पोलिसांनी मिशन शक्ती मोहिम राबविली होती. यामुळे महिला पोलिस शिपाई रोड रोमियोंची धरपकड करत होत्या. याच वेळी एक महिला शिपाई त्या गल्लीतून जात असताना वचक न राहिलेल्या या रोड रोमियोंनी तिची देखील छेड काढायला कमी केले नाही.
पोलिसांनी सांगितले की, रोड रोमियोंची पुढेही धरपकड सुरु राहणार आहे. महिला पोलिसाची छे़ड काढणारा तरुणही लवकरच गजाआड असणार आहे.
गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये देशात उत्तर प्रदेश अव्वल आहे. यानंतर बिहारचा नंबर लागतो. गुन्हेगारी कमी करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री होताच एन्काऊन्टर सुरु केले होते. यामुळे काही प्रमाणावर तेथील गुन्हेगारी काबूत आली आहे. परंतू त्यांच्याच काळात बलात्काराच्या मोठमोठ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एका आमदारावरही गंभीर आरोप आहेत.