लव्ह मॅरेज! मेहंदी लावून तयार होती वधू; तरीही प्रियकराने एक व्हिडीओ पाहून लग्नास नकार दिला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 12:53 PM2021-05-17T12:53:45+5:302021-05-17T12:57:45+5:30

Love marriage cancelled because of one Video: दोन्ही पक्षांसोबत पोलीस चर्चा करत असून यामधून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू असे काय झाले, की लव्ह मॅरेज असुनही नवरदेवाने ऐन लग्नाच्या दिवशी प्रेयसीसोबत लग्नाला नकार दिला?

उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये एक हैरान करणारा प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने लग्नास नकार दिला आहे. धक्कादायक म्हणजे हे लव्ह मॅरेज होते. यामुळे हाताला मेहंदी लावून नवीन आयुष्य सुरु करण्याचे नववधूचे स्वप्न अधुरे राहिले आहे. (boyfriend saw a video and refused the marriage)

मुलीकडच्यांनी आता पोलिसांत धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. दोन्ही पक्षांसोबत पोलीस चर्चा करत असून यामधून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू असे काय झाले, की लव्ह मॅरेज असुनही नवरदेवाने ऐन लग्नाच्या दिवशी प्रेयसीसोबत लग्नाला नकार दिला?

एका गावामध्ये लग्नाची तयारी जोरात सुरु होती. घर फुलांनी सजविले जात होते. महिलांचे संगीत, नाचगाण्याचे कार्यक्रम सुरु होते. एक एक करुन कार्यक्रम पार पाडले जात होते. एवढ्यातच नवऱ्यामुलाचा नववधूला फोन येतो आणि त्याचाशी बोलताना अचानक ती बेशुद्ध होऊन खाली कोसळते.

कुटुंबीयांनी मुलीच्या चेहऱ्यावर पानी मारून तिला शुद्धीवर आणले. यानंतर ती रडू लागली. तिने लग्न मोडल्याचे सांगत वरात आता येणार नाही असे सांगितले. नवरदेवाने लग्नाला नकार दिला आहे. हे ऐकून तिचे कुटुंबीयही हैरान झाले आहेत. लग्नाच्या दिवशीच असे कोणी करू शकते का, असा प्रश्न पडला आहे.

हातांवर मेहंदी लागलेल्या अवस्थेत लग्नाची पत्रिका घेऊन नववधू एसपी ऑफिसला गेली आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती तिने पोलिसांना दिली. तिची तक्रार तिच्या गावाच्या पोलीस ठाण्यात वळती करण्यात आली आहे. सायंकाळी उशिरा पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या लोकांना बोलावून घेतले, मात्र काही फायदा झाला नाही.

महत्वाची बाब म्हणजे हे त्यांचे लव्ह मॅरेज होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मुलगी एकुलती एक होती. तसेच दोघेही एकाच जातीचे आहेत. एका लग्न समारंभामध्ये त्यांची ओळख झाली. नंतर त्यांच्यात जवळीक वाढली आणि लग्नाचा निर्णय घेतला. 16 मे रोजी लग्नाची तारीख ठरली. मात्र, त्याच दिवशी नवरदेवाने लग्नास नकार दिला.

पोलिसांनी दोन्ही पक्षांना बोलवून त्यांचे नाते पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मुलगी लग्नासाठी अडून बसली होती. पोलिसांसमोरच मुलीने आरोप केला की, मुलाने लग्नाचा वादा केला होता. ती त्याच्यावर खूप प्रेम करते. जर त्याच्याशी लग्न झाले नाही तर ती जीव देईल.

तर मुलाचे म्हणणे आहे की, तिने त्याला प्रेमात दगा दिला आहे. तो हैदराबादमध्ये काम करतो. त्याने तिला एक स्कूटरही खरेदी करून दिली होती. याशिवाय तिला 1 लाख 25 हजार रुपयेही दिले होते. ते पैसे तिने गोरखपुरच्या एका व्यक्तीला नोकरीला लावण्यासाठी लाच म्हणून दिले होते.

यानंतर नववधू आणि तो व्यक्ती यांच्यात फोनवर संभाषण होऊ लागले. दोघांमध्ये संबंधही वाढू लागले. नवऱ्यामुलानुसार त्या व्यक्तीनेच दोघांच्या बोलण्याचा व्हिडीओ पाठविला आहे, यामुळे त्याचा प्रेमभंग झाला आहे आणि तिच्याशी लग्न करण्याची अजिबात इच्छा राहिलेली नाही. तुरुंगात जावे लागले तरीही.

चौथ पोलीस ठाण्याचे अधिकारी अजित कुमार यांचे म्हणणे आहे की, मुलीची तक्रार महिला पोलीस ठाण्यावरून आमच्याकडे आली आहे. दोन्ही बाजुंना बोलवून घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. मात्र, तोडगा निघालेला नाही. जर कोणताही तोडगा निघाला नाही, तर तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे.