प्रेयसीनं रात्री घरी बोलावणं ठरलं कर्दनकाळ; घरी जाताच झाली हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 07:59 PM2020-05-27T19:59:26+5:302020-05-27T20:13:20+5:30

ही घटना पुरंदरपूर पोलिस स्टेशन परिसरातील राजपुर तेनुअहिया गावची आहे.

यूपीच्या महाराजगंज जिल्ह्यात आपल्या प्रेयसीच्या बोलावण्यावरून घरी गेलेल्या प्रियकराच्या हत्येचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी प्रेयसीच्या वडिल आणि भावाविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

सोमवारी उशिरा रात्री प्रेयसीच्या बोलावण्यावरून प्रियकर अच्छेलाल हा महाराजगंज जिल्ह्यात पोहोचला. प्रेयसीला भेटल्यानंतर तो बाहेर येताच तिच्या वडिलांनी आणि भावाने त्याला घेरले आणि लाठीने मारहाण करण्यास सुरवात केली.

प्रेयसीने मध्यस्थी करून प्रियकरला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचे वडील व भाऊ प्रियकरचा मृत्यू होईपर्यंत मारहाण करत राहिले.

प्रेयसीने प्रियकराच्या घरी पोहोचली आणि त्याच्या कुटुंबियांना त्याची माहिती दिली. तेथून कोणी येईपर्यंत प्रियकराचा मृत्यू झाला होता.

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा तपास केला आणि आरोपी वडील व मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

एएसपी आशुतोष शुक्ला यांनी सांगितले की, प्रेयसीने आपल्या प्रियकराला घरी बोलवले होते. घराबाहेर पडताना प्रेयसीच्या वडील आणि भावाने त्याला पाहिले आणि त्यानंतर त्यांची हत्या केली गेली.