वर्षभरापासून प्रियकराला आपल्या घरात लपविलेले; एक दिवस पतीला दिसले, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 12:19 PM2021-08-23T12:19:41+5:302021-08-23T12:26:37+5:30

wife Lover secretly living in Man's house: धक्कादायक बाब म्हणजे हा प्रियकर तिच्या घरात गेल्या एक वर्षापासून लपून राहत होता. पतीला एवढे दिवस हासभासही नव्हता.

अमेरिकेमध्ये खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या प्रियकराने तिच्या पतीवर गोळी झाडली (Husband Shot By Wife Lover) आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रियकर तिच्या घरात गेल्या एक वर्षापासून लपून राहत होता. पतीला एवढे दिवस हासभासही नव्हता. (Husband is shot and injured by wife's lover who was secretly LIVING in their home for more than a year)

पतीवर गोळी मारण्य़ासाठी प्रेयसी पत्नीनेच प्रियकराला मदत केली होती. पतीपासून लपवून ती प्रियकराच्या राहण्याचा आणि खाणपाणाचा बंदोबस्त करत होती. परंतू एक दिवस तिचे बिंग फुटले आणि पतीवर प्राण गमावण्याची वेळ येऊन ठेपली होती.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार अलबामा (Alabama) मध्ये 58 वर्षीय फ्रँक रीव्स त्यांची पत्नी ट्रेसीसोबत राहत होते. 15 ऑगस्टला जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांनी त्यांच्यापत्नीसोबत अनोळखी व्यक्ती असल्याचे दिसले. त्यांना काही कळायच्या आतच त्या व्यक्तीने फ्रँकवर हल्ला केला. पाहता पाहता दोघांमध्ये गोळीबार होऊ लागला. (ट्रेसी))

आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, ट्रेसीचा प्रियकर माइकल अमाकर याने फ्रँकला पाहिले नव्हते. तिने त्याला कोणीतरी घुसखोर घरात घुसल्याचे सांगितले. यामुळे अमाकरने त्याच्यावर गोळीबार करायला सुरुवात केली.

फ्रँकला गोळी लागली. त्याच्या जवळही बंदूक होती. त्यानेही अमाकरवर गोळ्या चालविल्या. फ्रँकला देखील तो कोण आहे याची कल्पना नव्हती. त्यानेही प्रत्यूत्तर देण्यास सुरुवात केली.

या चकमकीत फ्रँकच्या छातीवर आणि अमाकरच्या पायाला आणि कोपराला गोळी लागली. दोघांनाही जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांना गंभीर दुखापत नसल्याचे सांगण्यात आले. ट्रेसीने पतीला प्रियकराच्या हातून ढगात धाडण्याचा बंदोबस्त केला होता, परंतू तीच आता तुरुंगात गेली आहे. (पत्नी आणि तिचा प्रियकर)

ट्रेसी आणि तिचा प्रियकर अमाकर हे ड्रग्स अॅडिक्ट होते. गोळीबार करताना दोघेही नशेत होते. अमाकर हा फ्रँकच्या घरी गेल्या वर्षभरापासून लपून राहत होता. ट्रेसी त्याला जेवन, पाणी द्यायची.

लघवीसाठी वारंवार बाथरुमला जावे लागते म्हणून अमाकर हा बाटल्यांमध्येच लघवी करायचा. फ्रँक बाहेर कामाला गेला की अमाकर बाहेर यायचा आणि घरात वावरायचा. (प्रियकर अमाकर)

शेजाऱ्यांनी सांगितले की, फ्रँक शांत स्वभावाचा होता आणि तो जास्त लोकांमध्ये मिसळत नसायचा. जेव्हा गोळ्यांचा आवाज आला तेव्हा शेजाऱ्यांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. तिथे फ्रँक आणि आणखी एक व्यक्ती गोळीबारात जखमी होऊन पडल्याचे दिसले. (पती फ्रँक)

हॉस्पिटलमधून अमाकरला सोडण्यात आले, यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न, बेकायदा बंदूक बाळगणे, अमली पदार्थ सेवन असे आरोप ठेवण्यात आले आहेत. अमाकरचे आधीपासून गुन्हेगारी रेकॉर्ड आहे.

फ्रँकची पत्नी आणि अमाकरची प्रेयसी ट्रेसीवर अंमली पदार्थ सेवन आणि साठा करणे याचे आरोप लावण्यात आले आहेत.

तपास अधिकाऱ्यांनुसार ट्रेसीने आपल्या प्रियकराला पती घुसखोर असल्याचे का सांगितले हेच अद्याप समजलेले नाही. तिने फ्रँकच्या हत्येचा प्रयत्न का केला, याचा तपास पोलीस करत आहेत. ट्रेसीने पतीचा प्रेमसंबंधातील काटा बाजुला काढण्याच्या उद्देशाने तसे केल्याचा संशय पोलिसांना आहे.

Read in English