man who married to 10 women killed by his sister in law in uttar pradesh
दहा लग्न करुनही मूलबाळ न झाल्यानं मोठा निर्णय घेतला अन् तोच जीवावर बेतला By कुणाल गवाणकर | Published: January 27, 2021 07:21 PM2021-01-27T19:21:24+5:302021-01-27T19:25:49+5:30Join usJoin usNext उत्तर प्रदेशच्या बरेलीत घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दहा महिलांसोबत लग्न केल्यानंतरही मूलबाळ न झाल्यानं व्यक्तीनं एक इच्छा व्यक्त केली. पुढे हीच इच्छा त्याच्या जीवावर बेतली. १० लग्न करुनही संततीसुख न मिळाल्यानं ५५ वर्षीय व्यक्तीनं त्याची कोट्यवधींची संपत्ती पुतण्याच्या नावावर करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र हीच इच्छा त्याच्या मृत्यूचं कारण ठरली. या प्रकरणात पोलिसांनी मृत व्यक्तीच्या वहिनीला अटक केली आहे. तिनंच सुपारी देऊन दिराचा खून केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. पोलिसांनी वहिनीसोबतच चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. बरेलीच्या भोजीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ५५ वर्षीय जगन लाल यांची २० जानेवारीला गळा दाबून हत्या करण्यात आली. जगन लाल यांच्या १४ एकर जमीन होती. ते गावातच वास्तव्यास होते. त्यांनी १० विवाह केले. मात्र त्यांना मूलबाळ झालं नाही, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. जगन लाल यांच्या काही पत्नींचं निधन झालं. तर काही त्यांना सोडून गेल्या. मृत्यू समयी जगन लाल दोन पत्नींसह गावात राहत होता. जगन लाल यांना मूलबाळ नसल्यानं त्यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर इतरांची नजर होती. २० जानेवारीला रात्री जगन लाल यांची गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला. या तपासातून धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला. जगन लाल यांच्या वहिनीनंच सुपारी देऊन त्यांची हत्या केल्याचं तपासातून उघडकीस आलं. मूलबाळ नसल्यानं जगन यांनी पुतण्याला स्वत:चा सांभाळ करण्यासाठी सोबत ठेवलं होतं. आपली सर्व संपत्ती पुतण्याच्या नावे करण्याचा जगन यांचा विचार होता. ही गोष्ट त्याची वहिनी मुन्नी देवीला समजली. त्यानंतर तिनं जगन यांच्या हत्येचा कट रचला. मृत्यूपत्र लिहिण्याआधीच जगन यांना ठार केल्यास सर्व संपत्ती आपल्याला मिळेल, या विचारानं मुन्नी देवीनं जगन यांची सुपारी दिली. पोलीस तपासातून या सगळ्याचा उलगडा झाला.टॅग्स :लग्नखूनmarriageMurder