Man’s wallet lost in local train found by cops after 14 years in Mumbai
तब्बल १४ वर्षापूर्वी रेल्वेत चोरी झालेलं पाकीट सापडलं; ९०० रुपयांसह मालकाला परत दिलं, पण... By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 04:45 PM2020-08-09T16:45:40+5:302020-08-09T16:50:28+5:30Join usJoin usNext मुंबईची लाईफलाईनमध्ये लोकल ट्रेन, या ट्रेनमध्ये दिवसाला लाखो लोक प्रवास करत असतात, प्रचंड गर्दीतही चाकरमानी आपली वाट काढत कामाच्या ठिकाणी जात असतो. मुंबई लोकलमध्ये असणारी गर्दी ही चोरांसाठीची संधी असते, अनेकदा लोकल ट्रेनमध्ये पाकिट, मोबाईल, बॅग चोरण्यात येतात, यात अनेक टोळ्या सक्रीय असतात. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हरवलेली वस्तू तुम्हाला क्वचितच सापडते, अन्यथा एकदा हरवलेली वस्तू तुम्हाला परत मिळेलच याची काही शाश्वती नाही. पण आता एक अशी घटना घडली आहे ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये १४ वर्षापूर्वी चोरी झालेलं पाकिट पोलिसांनी शोधून त्याच्या मालकाला परत केले आहे. या पाकिटात ९०० रुपये होते. हे पाकिट शोधून पुन्हा त्याच्या मालकाला देण्यात आले आहे. २००६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पनवेल लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या हेमंत पडळकर यांचे हे पाकिट, जीआरपीच्या पोलीस पथकाने १४ वर्षानंतर हे पाकिट शोधून दिलं आहे. सध्या कोरोना काळ असल्याने रेल्वेची सेवा फक्त अत्यावश्यक लोकांसाठी सुरु करण्यात आली आहे. अशातच एप्रिल महिन्यात वाशीच्या जीआरपीने हेमंत यांना फोन करुन तुमचं पाकिट मिळाल्याची माहिती दिली आहे. मात्र लॉकडाऊन असल्याने हेमंत पाकिट आणण्यासाठी जाऊ शकले नाहीत, पण आता लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर पनवेलमध्ये राहणाऱ्या हेमंत यांनी वाशीच्या जीआरपी कार्यालयात पोहचून रोख रक्कमेसह पाकिट पुन्हा आपल्या ताब्यात घेतले आहे. हेमंत पडळकर यांनी सांगितले की, त्यावेळी माझ्या पाकिटात ९०० रुपये होते, ज्यात ५०० रुपयांची जुनी नोट आहे. नोटबंदीमुळे ही जुनी नोट चलनातून बंद करण्यात आली आहे. वाशी जीआरपीने मला ३०० रुपये परत दिले आहेत. तर उर्वरित १०० रुपये स्टॅम्प पेपरचा खर्च म्हणून कापले आहेत, तर ५०० रुपयांची नोट बदलल्यानंतर नवीन नोट घेऊन जा असं जीआरपीने हेमंत पडळकर यांना सांगितले आहे. ज्यावेळी हेमंत पडळकर जीआरपी कार्यालयात पोहचले तेव्हा अनेकजण त्याठिकाणी चोरलेल्या वस्तू परत घेण्यासाठी आले होते, त्यातील बहुतांश जणांच्या जुन्या नोटा होत्या, आता या नोटा बदलून जीआरपी आम्हाला पैसै परत करतील. तब्बल १४ वर्षानंतर चोरी झालेलं पाकिट मिळाल्याने हेमंत पडळकर आनंदी आहेत, तर चोराला अलीकडेच पकडलं असल्याचं जीआरपीने सांगितले. आरोपीकडून आम्ही ९०० रुपये कलेक्ट केले आहेत. त्यातील ३०० रुपये दिल्याचं जीआरपीने सांगितले. तर बाकीचे ५०० नवीन नोट आल्यानंतर देणार असल्याचं जीआरपी म्हणाले. Read in Englishटॅग्स :मुंबई लोकलपोलिसचोरीमुंबईरेल्वेMumbai LocalPolicetheftMumbairailway