Parambir singh: मनसुख हिरेन हत्या, स्फोटकांचे प्रकरण कधीच उलगडले असते; ATS चे परमबीर सिंगांकडे बोट By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 10:59 AM 2021-04-01T10:59:20+5:30 2021-04-01T11:13:19+5:30
Mansukh Hiren murder Case, Sachin Vaze used Scorpio Car in CP Office: डायरीवरून एनआयए हत्याप्रकरणाचे कोडे सोडविल्याचा दावा करत असताना दुसरीकडे महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करायला दिली असती तर मनसुख हिरेन मर्डर मिस्ट्री आणि जिलेटीन ठेवल्यावरून पडदा हटला असता असा दावा केला आहे. मुंबई : मनसुख हिरेन हत्याप्रकरणी (Mansukh Hiren Murder Case) अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांच्या घरातून एआयएने एक डायरी ताब्यात घेतली आहे. डायरीवरून एनआयए हत्याप्रकरणाचे कोडे सोडविल्याचा दावा करत असताना दुसरीकडे महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करायला दिली असती तर मनसुख हिरेन मर्डर मिस्ट्री आणि जिलेटीन ठेवल्यावरून पडदा हटला असता असा दावा केला आहे. (Maharashtra ATS asked to gave permission of CP Office CCTV footage four times from Parambir singh)
ATS सुत्रांनुसार मनसुख मर्डर केस खूप आधीच सोडविता आली असती, जर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वेळेवर सहकार्य केले असते. महाराष्ट्र एटीएसने पोलीस आयुक्तालयाकडे त्यांना सीसीटीव्ही फुटेजचा अॅक्सेस मागितला होता. परंतू तो वेळेत दिला गेला नाही. (Sachin Vaze use Squarpio of Mansukh Hiren In CP Office for three days.)
तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंगांना (Ex CP Parmbir Singh) महाराष्ट्र एटीएसने चार पत्रे लिहिली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने हे प्रकरण सोडविण्याऐवजी उलट अडचणी वाढत गेल्या.
एटीएसच्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की, अँटिलिया जिलेटीन स्फोटके सापडल्याच्या दिवशी म्हणजेच 25 फेब्रुवारीच्या 45 दिवस आधी आणि स्फोटके सापडल्याच्या नंतरच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करायची होती.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती ती कार 19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी असे तीन दिवस पोलीस मुख्यालयामध्ये आणण्यात आली होती. यामुळे सीसीटीव्ही फुटेज दिल्यास हे उघड झाले असते. मात्र, एटीएसला सीसीटीव्ही फुटेज देण्याची परवानगी देण्यात आली नाही.
शिंदेंच्या डायरीमध्ये वसुलीचे गुपित... एनआयए सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक शिंदे यांच्या घरातून एक डायरी मिळाली आहे. यामध्ये वाझेच्या वसुलीची माहिती नोंद आहे. यामध्ये जवळपास 30 पब आणि बियर बारची नावे आणि पत्ते लिहिलेले आहेत. त्यांच्याकडून वसुली करण्याची जबाबदारी वाझेने शिंदेला दिली होती. याशिवाय काही पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि व्यावसायिकांची नावेदेखील पत्त्यासह या डायरीमध्ये आहेत.
दर महिन्याला 2 लाखांचे टार्गेट... मुंबई पोलिसांशी संबंधित एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार दर महिन्याला 2 लाख रुपये वसूल करून वाझेकडे द्यावेच लागत होते. पोलीस जेव्हा कधी बिअर बार आणि बेकायदा अड्ड्यांवर छापा टाकायची तेव्हा त्यांना वाझेचा फोन यायचा. यामध्ये तो अटक केलेल्या व्यक्तींना सोडण्यास सांगत असे.
सचिन वाझेकडे बेकायदा धंदेवाले लाखो रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिटठेवून संरक्षण घेत असल्याचा नियम जगजाहीर आहे. यामध्ये क्रिकेट बुकींपासून सर्व अवैध धंदेवाले सहभागी आहेत.
दर महिन्याला 28 कोटींची वसुली : निरुपम पोलीस कर्मचाऱ्यांवर वसुलीचा आरोप लागलेला असताना मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी एक वक्तव्य केले आहे. मुंबईतील 1400 बिअर बार आणि बेकायदा धंदेवाईकांकडून प्रत्येकी 2 लाय़ख रुपये म्हणजेच महिन्याला जवळपास 28 कोटी रुपये वसूल केले जात आहेत. ही रक्कम पोलीस इन्स्पेक्टरपासून वरच्या पोलीस आयुक्तापर्यंत पोहोच केली जाते.
हा प्रकार मुंबईमध्ये खूप वर्षांपासून सुरु आहे. कोणताही नवीन नियम लागू झाला की पोलिसांची कमाई आपोआप वाढते. हे सारे पोलिसांच्या संरक्षणात होते. वसुलीचा प्रकार कोणापासून लपलेला नाहीय, असा आरोप निरुपम यांनी केला आहे. या बाबतचे वृत्त एनबीटीने दिले आहे.
सचिन वाझेने घटनास्थळी एटीएस अधिकाऱ्याला जेव्हा स्फोटकांची स्कॉर्पिओ पहायची होती तेव्हा अपमानास्पद वागणूक दिली होती. सँडिविच खात त्याने दुसऱ्या पोलिसाला साहेबांना गाडी दाखव असे हातवारे केले होते. यावेळीही त्याची तक्रार परमबीर यांच्याकडे केली होती.