Marital Rape: पतीने महाबळेश्वरला इच्छा नसताना संबंध ठेवले, लकवा मारला; पत्नीच्या तक्रारीवर न्यायालयाने दिला निर्णय By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 11:21 AM 2021-08-14T11:21:59+5:30 2021-08-14T11:29:39+5:30
Marital Rape at honeymoon: नोव्हेंबर 2020 मध्ये लग्न झाले होते, नवविवाहित जोडपे महाबळेश्वरमध्ये फिरायला गेले होते. पत्नी मुंबईला परतल्यानंतर डॉक्टरकडे गेली, तेव्हा तिला कंबरेखालील भाग लकवाग्रस्त झाल्याचे समजले. मुंबई : पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी मुंबईच्या सेशन कोर्टाने निर्णय सुनावला आहे. जरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पत्नीने केला होता. यावर त्याने कोणतेही बेकायदेशीर काम केले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. (Husband made forcefully sex, wife paralized; Mumbai Court said its not crime.)
महत्वाचे म्हणजे केरळच्या न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना मॅरिटल रेप क्रूरता असल्याचे म्हटले होते. तसेच हे कारण घटस्फोटासाठी आधार मानले जाऊ शकते असेही म्हटले होते. यामुळे एकाच विषयाशी संबंधीत दोन टोकाचे निर्णय आले आहेत.
मुंबईचे अतिरिक्त सेशन न्यायाधीश एस जे घरत यांनी सांगितले की, आरोपी व्यक्ती महिलेचा पती आहे. यामुळे पतीच्या नात्यातून त्याने काही बेकायदा काम केल्याचे म्हणता येणार नाही. याचबरोबर न्यायालयाने महिलेच्या पतीला जामिन दिला.
महिलेचा असा दावा आहे की, पतीने इच्छा नसताना जबरदस्तीने सेक्स केल्याने तिला लकवा मारला आहे. तसेच हुंड्याची मागणी करत त्रास देत होता. यावर पतीने जामिन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
महिलेचे लग्न 22 नोव्हेंबर 2020 मध्ये झाले होते. महिलेने पती आणि त्याच्या कुटुंबाविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. यामध्ये आरोप लावण्यात आला की, लग्नानंतर पती आणि त्याच्या घरातले तिच्याकडे हुंडा मागत आहेत आणि त्रास देत आहेत.
महिलेने पतीवर आरोप केला आहे की, ती पतीसोबत दोन जानेवारीला महाबळेश्वरला फिरायला गेली होती. तिथे पतीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले आहे. उपचारासाठी जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा तिला समजले की कंबरेच्या खालचा भाग लकवाग्रस्त झाला आहे.
सुनावणीवेळी पतीने आरोप फेटाळले. त्याला खोट्या आरोपांमध्ये अडकविले जात आहे. त्याने आणि त्याच्या कुटुंबाने हुंडा मागितलेला नाही. दोन्ही बाजु ऐकल्यावर घरत यांनी सांगितले की, महिलेला लकवा झालाय ही दुखद घटना आहे. मात्र, या साठी पतीला किंवा त्याच्या कुटुंबाला जबाबदार ठरवता येत नाही.
महिलेने ज्या प्रकारे पती आणि त्याच्या कुटुंबावर हुंडा मागितल्याची तक्रार केली आहे, त्यात हुंड्यामध्ये काय मागितले याची माहिती नाहीय. यामुळे या प्रकरणी पतीला ताब्यात घेऊन चौकशी करण्याची काहीच गरज नाहीय, असा आदेश घरत यांनी देत पतीला संरक्षण दिले आहे.
केरळ न्यायालयाने काय म्हटलेले... केरळच्या न्यायालयाने वैवाहिक बलात्कारच्या प्रकरणावर म्हटलेले की, पतीचा अधिकार जो पत्नीच्या इच्छेविरुद्ध असेल तर तो वैवाहिक बलात्कार म्हटला जाऊ शकतो. कायद्यानुसार तो गुन्हा ठरत नाही आणि शिक्षाही दिली जाऊ शकत नाही. परंतू तो मानसिक आणि शारीरिक छळ होऊ शकतो.
तेथील महिलेचा दावा होता, की पतीची कामेच्छा आणि मालमत्तेची हाव यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे. घटस्फोटासाठी तिने 12 वर्षांपूर्वी अर्ज केला होता.
जेव्हा ती आजारी असायची, बेडवर थकलेली असायची किंवा कोणत्याही नातेवाईकाचा मृत्यू झाला त्यावेळीही पती तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायचा, असा आरोप तिने केला होता.