Sachin Vaze: आरशात नव्हे तर CCTV मध्ये सचिन वाझेनं स्वत:ला पाहिलं; पोलीस कंट्रोल रुममध्ये ‘त्या’ दिवशी काय घडलं? By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 09:40 AM 2021-04-05T09:40:47+5:30 2021-04-05T09:44:37+5:30
Mukesh Ambani Bomb Scare: NIA तपासात सचिन वाझेबद्दल धक्कादायक खुलासे येत असताना आता काही अधिकारीही दबक्या आवाजात या प्रकरणावर भाष्य करत आहेत, यात सचिन वाझे आणि डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्याचं भांडण तसेच तपासात वाझे दिशाभूल कसे करत होते याचा खुलासा होत आहे. सचिन वाझेच्या अटकेनंतर काही दिवसांनी NIA ने मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया घराबाहेर क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी गेली होती, त्यावेळी सचिन वाझेला मोठा सफेद कुर्ता आणि डोक्यावर रूमाल बांधून काही मिनिटं याठिकाणी पायी चालायला लावलं होतं.
मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशाने हे चित्र पाहिलं, परंतु सचिन वाझेने मुंबई पोलीस कंट्रोल रूममध्ये २७ फेब्रुवारीला स्वत:चे हे दृश्य पाहिलं होतं, NIA च्या दाव्यानुसार २५ फेब्रुवारीला सचिन वाझे सफेद कुर्ता आणि डोक्यावर रुमाल बांधून अँटेलिया घराबाहेर स्कोर्पिओ ठेवली आणि मागील इनोव्हा गाडीने निघून गेले.
मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी कंट्रोल रुममध्ये २५ फेब्रुवारीचं रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत होते, तेव्हा सचिन वाझेही तिथे उपस्थित होता, मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांची १० टीमही तिथे हजर होती.
ज्यावेळी CCTV फुटेजमध्ये सफेद कुर्ता घातलेला पीपीई किट्समधला माणूस दिसत होता, तेव्हा सचिन वाझेने हे फुटेज आणि अन्य फुटेज यापुढे बघण्यास रोखले, हे फुटेज मीडियाच्या हाती लागले तर तपास यंत्रणेवर परिणाम होईल आणि आरोपी पळून जाईल असं वाझेने सांगितले.
तोपर्यंत सचिन वाझेवर कोणाचाही संशय नव्हता, परंतु जेव्हा २७ फेब्रुवारीला तपासातून गुन्हे शाखेच्या १० टीमना वेगळं केलं, आणि सचिन वाझे यांनाच तपास करण्यास सांगितले, तेव्हा अनेक अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
या अधिकाऱ्यांनी जेव्हा काही दिवसांनी सचिन वाझेला NIA ने क्राईम रिक्रिएट करण्यासाठी अँटेलिया बंगल्याबाहेर नेलं, तिथे सफेद कुर्ता आणि डोक्यावर रुमाल घालून चालायला लावलं तेव्हा अधिकाऱ्यांना लक्षात आलं की वाझेने कंट्रोल रुममध्ये तपास यंत्रणेला CCTV फुटेज बघण्यापासून का रोखलं?
जोपर्यंत क्राईम ब्रांचचे अधिकारी तपास करत होते, तेव्हा या प्रकरणाचे अपडेट सचिन वाझे स्वत: फोन करून घेत होते, जसंही वाझेला वाटायचं की तपास यंत्रणेला कोणता पुरावा हाती लागत आहे, तेव्हा काही ना काही बहाणा करून वाझे तपास यंत्रणाची दिशाभूल करत होता.
२५ फेब्रुवारीला रात्री दुसऱ्या तपास यंत्रणेचे डीआयजी आणि सचिन वाझे यांच्यात जोरदार भांडण झालं, त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंब्रई क्राईम ब्रांचला देण्याची घोषण गृहमंत्र्यांनी केली. अनिल देशमुख यांना चुकीची माहिती पुरवण्यात आली, कारण या तपासातून इतर यंत्रणांना चौकशीपासून वेगळं करण्यात येईल.
सचिन वाझे डीआयजी समोर आले असतानाही सॅल्यूट न करता सँडविच खात उभा होता, तेव्हा वाझेच्या बोलण्यामुळे डीआयजी संतापले होते, त्यांनी येलो गेटजवळ पार्क केलेल्या स्कोर्पिओकडे गेले, तिथे त्या गाडीचे चहुबाजूने फोटो काढले. या फोटोत काचेवर छोट्या अक्षरात गाडीचा मूळ क्रमांक सापडला, त्या नंबरवरून तपासाला दिशा मिळाली
२५ फेब्रुवारीला सचिन वाझे आणि डीआयजीचं भांडण झालं होतं, त्यापूर्वी महाराष्ट्र पोलीसमधील मोठे आयपीएस अधिकारी गिरगाव चौपाटीवर पोहचले, त्यांनी वाझेच्या खांद्यावरून हात ठेऊन बाजूला घेऊन गेले, तिथे दोघांमध्ये संवाद झाला. एपीआय दर्जाच्या वाझेचं आयपीएस अधिकाऱ्यांशी अशा वागणुकीतून त्याच्या डोक्यावर मोठा वरदहस्त असण्याची शक्यता वाटते, सध्या NIA हाच गॉडफादर शोधण्यासाठी प्रयत्नशील आहे.