Now Pregnant Buffalo Killed In Kerala 5 People Arrested In Connection With Case
निर्दयी माणूस! गर्भवती म्हशीची शिकार करुन पोटातील गर्भाचेही केले तुकडे, २५ किलो मांस जप्त By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 09:02 PM2020-08-20T21:02:25+5:302020-08-20T21:05:59+5:30Join usJoin usNext काही महिन्यांपूर्वी हत्तीच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला होता. केरळमध्ये आता पुन्हा एकदा प्राण्यांवरील हिंसाचाराची भीषण घटना समोर आली आहे. यावेळी केरळमध्ये शिकारींनी गर्भवती म्हशीला (Bison) मारुन तिच्या पोटातील संपूर्ण वाढलेल्या गर्भाचे तुकडे केलेत. केरळमध्येच गरोदर हत्तीणीला स्फोटकांनी भरलेलं अननस खायला देण्याची घटना घडली होती. यात गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला होता. जूनमध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. असे असूनही केरळमधील सरकार शिकारी रोखण्यात अपयशी ठरत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शिकाऱ्यांनी प्रथम गर्भवती जंगली म्हशीला गोळ्या घातल्या. त्यानंतर, तिच्या गर्भाला पोटातून काढून त्याचे तुकडे केले गेले. केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यातील पुंचा जंगलात ही घटना घडली. वन्य म्हशीला भारतीय गौर असेही म्हणतात. ही प्रजाती आता धोक्यात आली आहे. ही बाब वनविभागाच्या लोकांना समजताच त्यांनी शिकारी अबूच्या घरावर छापा टाकला या छाप्यात अबूच्या घरातून २५ किलो मांस सापडले. यानंतर इतर शिकारींनाही अटक करण्यात आली. सुरेश बाबू, बुशथन, अन्सिफ, आशिक आणि सुशील हे शिकारी आहेत. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार या ६ जणांनी पुपाथीरीपारा परिसरातील खासगी मालमत्तेजवळ ही शिकार केली होती. या ६ आरोपींनी भ्रूण तोडून २०० किलो मांस काढले होते. त्यानंतर ते कापून विभागले गेले. गर्भाची डोके आणि हाडे जंगलातच राहिली होती. वन्यजीव संरक्षण अधिनियम -१९७२ अंतर्गत आता या शिकारींना किमान तीन ते सात वर्ष आणि दहा हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. वन्य म्हैस म्हणजे बायसनची उंची ७.२ फूटांपर्यंत जाते. त्यांचे वजन ६०० ते १५०० किलो पर्यंत असते. ते ताशी ५६ किलोमीटर वेगाने धावतात.Read in Englishटॅग्स :जंगलforest