खतरनाक! सूड घेण्यासाठी पतीची हत्या करणाऱ्या व्यक्तीसोबत केलं लग्न, नंतर तिने त्याचा खेळ केला खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 05:26 PM2021-07-17T17:26:00+5:302021-07-17T17:39:29+5:30

गोळी झाडल्यानंतर ती सकाळपर्यंत तिथेच बसून राहिली आणि लोकांना सांगितलं की, कुणीतरी तिच्या पतीला मारलं.

एका महिलेने आपल्या पतीच्या हत्येचा सूड घेण्यासाठी असा काही प्लॅन केला की, सगळेच हैराण झाले. ती तिच्या पतीच्या हत्येचा सूड घेण्याचा प्रयत्न तीन वर्षांपासून करत होती. यासाठी तिने पूर्ण प्लॅन केला होता. तिने आधी मारेकऱ्यासोबत मैत्री केली, नंतर त्याच्याशी लग्न आणि मग त्याची हत्या केली.

ही घटना आहे पाकिस्तानच्या कबायली प्रांतातील बाजोर जिल्ह्यातील. येथील महिलेच्या पतीचा ३ वर्षाआधी मृत्यू झाला होता. पण हे स्पष्ट नव्हतं की, त्याची हत्या झाली की त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.

बीबीसीच्या वृत्तानुसार, याची माहिती मिळवण्यासाठी महिलेने स्वत:हून प्रयत्न सुरू केले. तिला समजलं की, तिच्या पतीला दुसरं कुणी नाही तर त्याचाच मित्र गुलिस्तान खानने विषाच इंजेक्शन मारलं होतं.

महिलेने त्याच दिवशी ठरवलं होतं की, ज्याप्रकारे गुलिस्तानने तिच्या पतीचा जीव घेतला, त्याचप्रमाणे ती आपल्या पतीच्या हत्येचा सूड नक्की घेणार. महिला पाच ते सहा महिने आपल्या पतीच्या हत्येचा सूड घेण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला संधी मिळाली नाही.

त्यानंतर तिने एक प्लान केला. त्यानुसार कशाप्रकारे गुलिस्तानजवळ जायचं आणि कशाप्रकारे पतीच्या हत्येचा सूड घ्यायचा हे ठरवलं.

पोलिसांनुसार, महिलेने गुलिस्तानसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. गुलिस्तान आधीच विवाहित होता आणि त्याला एक मुलगाही होता. पण महिलेने गुलिस्तानला पैसे, गाडी इत्यादीची लालूस दाखवत त्याला लग्नासाठी तयार केलं.

पोलिसांनी महिलेच्या जबाबानुसार सांगितलं की, लग्नानंतर महिलेने गुलिस्तानला सांगितलं की, आपण आपल्या सुरक्षेसाठी घरात एक पिस्तुल ठेवलं पाहिजे. ज्यानंतर गुलिस्तानने एक पिस्तुल विकत आणलं.

हत्येच्या दिवशीचा उल्लेख करत महिलेने पोलिसांना सांगितलं की, 'मी रात्री जागी होते, साधारण १ वाजता दुसऱ्या रूममध्ये गेले आणि पिस्तुल घेऊन गुलिस्तानच्या रूममध्ये गेले. तो झोपलेला होता. मी त्याच्यावल गोळी झाडली. पण वेळेवर पिस्तुल खराब झाल्याने गोळी झाडल्याच गेली नाही'.

त्यानंतर ती दुसऱ्या रूममध्ये गेली आणि पिस्तुल चेक केली. त्यानंतर महिला पुन्हा गुलिस्तानच्या रूममध्ये गेली आणि त्यानंतर पहिली गोळी गुलिस्तानच्या डोक्यावर आणि दुसरी त्याच्या छातीवर मारली.

गोळी झाडल्यानंतर ती सकाळपर्यंत तिथेच बसून राहिली आणि लोकांना सांगितलं की, कुणीतरी तिच्या पतीला मारलं.

मात्र, चौकशीनंतर सत्य सर्वांसमोर आलं. पोलिसांना सांगितलं की, महिलेला कोर्टात सादर केल्यावर तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी तिच्याकडील पिस्तुलही ताब्यात घेतलं आहे.