सामान्य व्यक्ती ते IPS अधिकारी, पाहा कसा होता शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कुलदीप यांचा खडतर प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 04:00 PM 2021-09-01T16:00:41+5:30 2021-09-01T17:17:08+5:30
IPS Kuldeep Singh Chahal : युपीएससीच्या (UPSC) परीक्षेला लाखो विद्यार्थी मेहनत करून आणि अनेक तास अभ्यास करून बसतात. मात्र, फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळतं. विविध राज्यातील विद्यार्थी या परीक्षेसाठी खूप चांगली जय्यत तयारी करतात आणि यशाला गवसणी घालतात. असंच यश एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलाला मिळालं आहे. UPSC सारख्या कठीण परीक्षेत यश मिळाल्यानंतर सगळेच कौतुक करतात पण, यशापर्यंत पोहोचण्याचा रस्ता खडतर असतो. त्या खडतर रस्त्यावरचा प्रवास जिद्दीने करणारे लोकच आयुष्यामध्ये यशस्वी होतात. कुलदीप सिंह चहल यांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश गाठत आयपीएस अधिकारी बनले आहेत.
कुलदीप सिंह चहल यांचं आयुष्य लहानपणापासूनच संघर्षमय होतं. मात्र, त्यांनी हार न मानता खूप मोठ्या जिद्दीने कठीण परिस्थितीला तोंड दिलं.
अतिशय खडतर अशा UPSC परीक्षा कुलदिप यांनी नोकरी दिली. कुलदीप सिंह चहल हरियाणाच्या जिंद जिल्ह्याच्या उझाना गावचे राहणारे आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिथेच झालं आहे.
त्यानंतर त्यांनी कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटीमध्ये पुढील अभ्यास केला आणि पंजाब युनिव्हर्सिटी म्हणून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. अभ्यासाबरोबरच त्यांनी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर चंदिगड पोलिसमध्ये असिस्टंट सब इंस्पेक्टर म्हणून रुजू झाले. नोकरी करत असतानाच कुलदीप यांनी UPSC परीक्षेची जय्यत तयारी सुरू केली.
नोकरी सोडून फक्त अभ्यास एके अभ्यास करणं कुलदिप यांना अशक्य होतं. त्यामुळे त्यांनी नोकरी करता करता अभ्यासाला वेळ द्यायला सुरुवात केली. त्यामुळेच इतर उमेदवारांपेक्षा कुलदीप यांना पराकोटीची मेहनत करावी लागली.
महत्वाचे म्हणजे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करता आले नाही. त्यांनी २००९ मध्ये UPSC परीक्षा तिसऱ्या प्रयत्नात पास होत ८२ रँक मिळवला. त्यानंतर IPS अधिकारी होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं.